जस्टीन बिबरने मलायका-अरबाजला आणले एकत्र

By Admin | Updated: May 11, 2017 12:23 IST2017-05-11T12:22:39+5:302017-05-11T12:23:02+5:30

जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टीन बिबरच्या बुधवारी नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर रंगलेल्या म्युझिकल कॉन्सर्टला जवळपास 50 हजार प्रेक्षक उपस्थित होते.

Justin Bieber brought together Malaya-Arbjal | जस्टीन बिबरने मलायका-अरबाजला आणले एकत्र

जस्टीन बिबरने मलायका-अरबाजला आणले एकत्र

tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत 
नवी मुंबई, दि. 11 - जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टीन बिबरच्या बुधवारी नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर रंगलेल्या म्युझिकल कॉन्सर्टला जवळपास 50 हजार प्रेक्षक उपस्थित होते. बिबरच्या चाहत्यांमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश असून, बॉलिवूडचे अनेक बडे स्टार्स या कॉन्सर्टला आले होते. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये मीडियाचे सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते मलायका अरोरा आणि अरबाज खानने. 
 
बिबरच्या कॉन्सर्टला दोघे एकत्र आले होते. अरबाज आणि मलायकामधील पती-पत्नीचे नाते संपुष्टात आले असले तरी, दोघांमध्ये मैत्रीचे नाते अजूनही टिकून आहे. बिबरच्या कॉन्सर्टच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे दिसून आले. अरबाज आणि मलायकाने एकत्र एंट्री करताच ते दुश्य टिपण्यासाठी कॅमे-यांचा एकच लखलखाट सुरु झाला. दोघांचा 14 वर्षांचा मुलगा अरहानही त्यांच्यासोबत होता. 
 
मलायका तिच्या नेहमीच्या हॉट लूकमध्ये दिसत होती तर, अरबाजने ब्लॅक टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. मागच्यावर्षी मलायका आणि अरबाजमधील 18 वर्षांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले. दोघांमध्ये समेट घडवण्यासाठी कुटुंबियांनी प्रयत्नही केले. पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. दोघे का विभक्त झाले ?, नेमके काय कारण आहे ते अजूनही स्पष्ट झालेले नाही. मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूरची वाढती जवळीक या ब्रेकअपला कारणीभूत ठरल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. 

Web Title: Justin Bieber brought together Malaya-Arbjal