'स्टार वॉर्स'मधील रोबोटच्या भूमिकेत दिसणार जिमी वी

By Admin | Updated: February 16, 2017 14:06 IST2017-02-16T14:06:10+5:302017-02-16T14:06:10+5:30

आगामी स्टार वॉर्सच्या सिक्वलमध्ये आर-2 डी-2 या रोबोटच्या भूमिकेत अभिनेता जिमी वी दिसणार आहे. 'स्टार वॉर्स : द फोर्स अवेकन्स' या मागील सिक्वलमध्ये आर-2 ची भूमिका जिमी वीने साकारली होती.

Jimmy V. to appear in Robot's role in 'Star Wars' | 'स्टार वॉर्स'मधील रोबोटच्या भूमिकेत दिसणार जिमी वी

'स्टार वॉर्स'मधील रोबोटच्या भूमिकेत दिसणार जिमी वी

>ऑनालाइन लोकमत
लॉस एंजेलिस, दि. 16 - आगामी स्टार वॉर्सच्या सिक्वलमध्ये आर-2 डी-2 या रोबोटच्या भूमिकेत अभिनेता जिमी वी दिसणार आहे. 'स्टार वॉर्स :  द फोर्स अवेकन्स' या मागील सिक्वलमध्ये आर-2 ची भूमिका जिमी वीने साकारली होती.
ओ सो स्मॉल प्रॉडक्शनकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये अभिनेता जिमी वी यांनी म्हटले आहे की, प्रसिद्ध अभिनेते केनी बेकर यांच्यासोबत काम करणे माझ्यासाठी एक आनंदाची बातमी होती. त्यांनी मला स्टार वॉरमध्ये आर-2 डी-2 साकारताना अनेक गोष्टी शिकविल्या. स्टार वॉर्स युनिव्हर्सचा मी एक भाग असल्यामुळे मी खूप उत्साहित आहे. आम्ही गेल्यावर्षीपासून मोठ्या मेहनतीने काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला पाहण्यास प्रेक्षक सुद्धा उत्साहित आहेत.  
दरम्यान, अभिनेते केनी बेकर यांचे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात निधन झाले होते. पहिल्या तीन स्टार वॉर्सच्या सीक्वलमध्ये केनी बेकर यांनी रोबोटची भूमिका साकारली होती.  

Web Title: Jimmy V. to appear in Robot's role in 'Star Wars'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.