जान्हवी कपूरने सोशल मीडियावर लावली आग, मात्र करिना कपूरची कॉपी केल्याचा लागला टॅग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 12:50 PM2021-03-09T12:50:53+5:302021-03-09T13:00:17+5:30

Janhvi Kapoor stuns in golden Dress 'रुही' हा चित्रपट दिनेश विजानचा हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा दुसरा भाग आहे. त्याचा पहिला भाग ‘स्त्री’ होता जो २०१८मध्ये रिलीज झाला होता.

Janhvi Kapoor gets trolled for wearing an Same outfit like Kareena Kapoor Khan | जान्हवी कपूरने सोशल मीडियावर लावली आग, मात्र करिना कपूरची कॉपी केल्याचा लागला टॅग

जान्हवी कपूरने सोशल मीडियावर लावली आग, मात्र करिना कपूरची कॉपी केल्याचा लागला टॅग

googlenewsNext

जाह्नवी कपूर, राजकुमार राव आणि वरुण शर्माचा ‘रुही’ हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच चित्रपटाचे नवीन गाणे प्रदर्शित केले गेले आहे. हे एक  आयटम साँग असून जाह्नवी कपूरवर चित्रित करण्यात आले आहे.  पहिल्यांदाच जाह्नवी कपूर या चित्रपटात आयटम नंबर करताना दिसणार आहे.  

''नदियों पार'' या जुन्या गाण्याला रिक्रीएट करण्यात आले आहे. 2004 साली नदियों पार गाण्याने सा-यांची पसंती मिळवत धुमाकुळ घातला होता. या गाण्याची तिच लोकप्रियता इनकॅश करण्याचा पुन्हा प्रयत्न करण्यात आला आहे. एकीकडे जान्हवीचे पहिले आयटम साँग असल्यामुळे तिच्या डान्सिंग अदा पाहून चाहतेही फुल ऑन फिदा झाले आहेत. खुद्द जान्हवीनेही तिच्या या लूकचे काही फोटो चाहत्यांसह शेअर केले होते. तिच्या या फोटोंना फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. 


गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये जान्हवी अधिक सुंदर दिसत असून तिच्या सेक्सी मुव्हजनेही रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्यामुळे चित्रपटाचीही उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. तर दुसरीकडे गाण्यातला जान्हवीचा लूक पाहून अनेकांना करिना कपूरच्या लूकची आठवण झाली आहे. हुबेहुब करिनाच्या ड्रेससारखाच जान्हवी कपूरचा ड्रेस आहे. कॉपी कॅट म्हणूनही जान्हवीच्या या फोटोवर प्रतिक्रीया उमटत आहेत.


रुही हा चित्रपट दिनेश विजानचा हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा दुसरा भाग आहे. त्याचा पहिला भाग ‘स्त्री’ होता जो २०१८मध्ये रिलीज झाला होता. राजकुमार राव ‘स्त्री’ चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसला होता. त्यामध्ये श्रद्धा कपूरसोबत दिसली होती.

 

स्त्री चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. यानंतर दिनेश विजानने आता याचा दुसरा भाग घेऊन आला आहे. रुही चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Janhvi Kapoor gets trolled for wearing an Same outfit like Kareena Kapoor Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.