कामाच्या ताणामुळे जॅकलीन झाली कुटुंबापासून दूर...!

By Admin | Updated: July 4, 2016 00:38 IST2016-07-04T00:38:12+5:302016-07-04T00:38:12+5:30

‘बी टाऊन’ च्या सेलिब्रिटींना असे क्वचितच होते की, ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मस्तपैकी एन्जॉय करत आहेत.

Jacqueline went away from the family due to the stress of work! | कामाच्या ताणामुळे जॅकलीन झाली कुटुंबापासून दूर...!

कामाच्या ताणामुळे जॅकलीन झाली कुटुंबापासून दूर...!


‘बी टाऊन’ च्या सेलिब्रिटींना असे क्वचितच होते की, ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मस्तपैकी एन्जॉय करत आहेत. चित्रपटांचे शेड्यूल्स आणि वेळेच्या अभावामुळे त्यांना घरच्यांसोबत राहताच येत नाही. असाच ताण काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्रा आणि दिपीका पदुकोन यांना सहन करावा लागला. आता यात जॅकलीन फर्नांडिस हिचेही नाव घेतले जात आहे. तिचे कुटुंबीय श्रीलंकेत राहतात. ती प्रथम ‘हाऊसफुल्ल ३’ च्या शूटींगमध्ये व्यस्त होती. त्यानंतर ‘ढिशूम’ च्या चित्रीकरणात बिझी झाली. आता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या एका चित्रपटासाठी शूटींग करते आहे. तिचे कुटुंबीय तिला सतत भेटायला ये म्हणून सांगत असतात. यावर ती म्हणते,‘ काही महिन्यांपासून माझे शेड्यूल फारच कठीण आहे. मी ख्रिसमसला घरी जायचे प्लॅनिंग करते आहे. तेव्हाच खरंतर थोडासा वेळ आहे माझ्याकडे. घरच्यांना खुप मिस करते आहे. सर्वांसोबत असते तेव्हा मला काहीही ताण येत नाही.

Web Title: Jacqueline went away from the family due to the stress of work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.