कपिल शर्माच्या शोमध्ये जॅकी चॅन करणार धमाल

By Admin | Updated: January 24, 2017 13:24 IST2017-01-24T13:24:37+5:302017-01-24T13:24:37+5:30

सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरु आहे. प्रमोशनसाठी भारतात आलेल्या जॅकी चॅनसह कलाकारांनी ' दि कपिल शर्मा'शो मध्ये हजेरी लावली आहे.

Jackie Chan will be seen in Kapil Sharma's show | कपिल शर्माच्या शोमध्ये जॅकी चॅन करणार धमाल

कपिल शर्माच्या शोमध्ये जॅकी चॅन करणार धमाल

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - अॅक्शन स्टार जॅकी चॅनचा 'कुंग-फू-योगा' हा चित्रपट सध्या ब-याच चर्चेत असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.  सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरु आहे. प्रमोशनसाठी भारतात आलेल्या जॅकी चॅनसह कलाकारांनी ' दि कपिल शर्मा'शो मध्ये हजेरी लावली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतं आहे. कुंग-फू-योगा या चित्रपटाची स्टार कास्ट शोमध्ये येणार असल्याची माहिती कपिल शर्माच्या ट्विटरवरुन मिळाली आहे. जॅकी चेन आलेल्या या एपिसोडचे शूटिंग नुकतच पार पडलं, मात्र तो एपिसोड कधी टेलिकास्ट होणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. 
 

एमएस धोनीमधील दिशा जॅकी चॅन सोबत करणार 'रोमान्स'

 
कुंग-फू-योगा' चित्रपटात जॅकीसोबत अभिनेता सोनू सूद, दिशा पटनी आणि अमेयरा दस्तूरही झळकणार आहेत. हा चित्रपट 3 फ्रेबुवारी रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान या चित्रपटासाठी एक खास ' आयटम नंबर' कोरिओग्राफ करणार असून आता जॅकी चॅन तिच्या तालावर नाचताना दिसणार आहे. या गाण्याचे चित्रीकरण फक्त भारतात नव्हे तर चीन आणि इर देशांमध्येही होणार आहे. या गाण्यात जॅकी कुर्ता, धोती आणि मोजडी या पारंपारिक भारतीय वेशातही दिसणार आहे. 
 
 
 

Web Title: Jackie Chan will be seen in Kapil Sharma's show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.