पुढचा नंबर तुझाच...; पुष्पगुच्छ घेऊन अनन्या पांडेला भेटायला पोहोचला ईशान खट्टर, झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 10:36 AM2021-10-24T10:36:48+5:302021-10-24T10:39:44+5:30

Ishaan Khatter Visits Ananya Panday VIRAL VIDEO : होय, ईशान खट्टरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात ईशान अनन्याच्या घरी फुलांचा गुच्छ घेऊन जाताना दिसतोय.

Ishaan Khatter spotted buying flowers, visits rumoured girlfriend Ananya Panday after her NCB questioning | पुढचा नंबर तुझाच...; पुष्पगुच्छ घेऊन अनन्या पांडेला भेटायला पोहोचला ईशान खट्टर, झाला ट्रोल

पुढचा नंबर तुझाच...; पुष्पगुच्छ घेऊन अनन्या पांडेला भेटायला पोहोचला ईशान खट्टर, झाला ट्रोल

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यंतरी ईशान व अनन्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. दोघांनी ‘खालीपीली’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं.

चंकी पांडेची मुलगी आणि बॉलिवूड  अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) एनसीबीच्या (NCB)रडारवर आली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात शाहरूख खानचा लेक आर्यन खान तुरूंगात आहेत. याच प्रकरणात अनन्यालाही एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं. सलग दोन दिवस एनसीबीने अनन्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पहिल्या दिवशी वडिलांसोबत एनसीबीच्या कार्यालयात जात असताना अनन्याची घाबरगुंडी उडाली होती. वडिलांना बिलगून कारमध्येच ती ढसाढसा रडली होती. वडिलांनी तिला आधार दिला होता. अनन्याचा जवळचा मित्र ईशान खट्टर (Ishaan Khatter) हा देखील अनन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा झाला आहे. होय, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात ईशान अनन्याच्या घरी फुलांचा गुच्छ घेऊन जाताना दिसतोय.
 सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये ईशान खट्टर फुलांच्या दुकानात स्वत: समोर उभं राहून पुष्पगुच्छ बनवून घेताना दिसत दिसत आहे. हा पुष्पगुच्छ खरेदी केल्यानंतर ईशान त्याच्या कारमध्ये बसतो आणि त्यानंतर ईशानची कार थेटअनन्याच्या इमारतीकडे जाताना दिसते.
मध्यंतरी ईशान व अनन्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. दोघांनी ‘खालीपीली’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. याचदरम्यान दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली होती. अर्थात आमच्यात काहीही नाही, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असं अनन्या व ईशानने स्पष्ट केलं होतं.

ट्रोल झाला ईशान...
हा व्हिडीओ समोर येताच ईशान नेटक-यांच्या निशाण्यावर आला आहे. अनेकांनी त्याच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनन्याच्या घरी फुलांचा गुच्छ घेऊन पोहोचलेल्या ईशानची अनेकजण खिल्ली उडवताना दिसत आहे. ‘माझं नाव प्लीज एनसीबीला सांगू नकोस, असं फुलांचा गुच्छ देऊन हा अनन्याला म्हणाला असेल,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘याचं तर करिअरही नाही, जे एनसीबी संपवेल म्हणायला. म्हणून बिनधास्त फुलं खरेदी करतोय,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

Web Title: Ishaan Khatter spotted buying flowers, visits rumoured girlfriend Ananya Panday after her NCB questioning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.