पोलिसांनी पकडलेला आणि सीसीटीव्हीत दिसलेला हल्लेखोर वेगवेगळा? फॉरेन्सिक लॅबचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 22:41 IST2025-01-22T22:41:02+5:302025-01-22T22:41:35+5:30

Saif Ali khan: पोलिसांनी ठाण्यातून  मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला अटक केली आहे. या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर युजर्समध्ये दोघांचे चेहरे मॅच होत नसल्याची चर्चा सुरु झाली होती.

Is the Saif Ali khan attacker caught by the police and seen in CCTV different? Forensic lab makes sensational claim | पोलिसांनी पकडलेला आणि सीसीटीव्हीत दिसलेला हल्लेखोर वेगवेगळा? फॉरेन्सिक लॅबचा खळबळजनक दावा

पोलिसांनी पकडलेला आणि सीसीटीव्हीत दिसलेला हल्लेखोर वेगवेगळा? फॉरेन्सिक लॅबचा खळबळजनक दावा

सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. यापूर्वी पोलिसांनी नागपूरमध्येही धावत्या ट्रेनमधून एका व्यक्तीला संशयित म्हणून पकडले होते. त्याला नंतर सोडून देण्यात आले. आताही पोलिसांनी ज्या आरोपीला पकडले आहे त्याच्या चेहरा आणि सैफवर हल्ला करून बाहेर पडताना सीसीटीव्हीत दिसत असलेल्या व्यक्तीचा चेहरा मॅच होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. 

पोलिसांनी ठाण्यातून  मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला अटक केली आहे. या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर युजर्समध्ये दोघांचे चेहरे मॅच होत नसल्याची चर्चा सुरु झाली होती. यावर दैनिक भास्करने फॉरेंसिक एक्सपर्टची मदत घेतली. यानुसार या दोघांचे फोटो मॅच होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. 

ब्रिलियंट फोरेंसिक इन्वेस्टिगेशन प्राइवेट लिमिटेडच्या हवाल्याने दोन्ही फोटोची तपासणी करण्यात आली. यामध्ये शरीफुल आणि इमारतीच्या सीसीटीव्हीत कैद झालेला व्यक्ती वेगवेगळे आहेत. फोटो रेकग्नेशननुसार दोघांच्या फोटोत खूप फरक आहे. 

काय जाणवला फरक...
शरीफुलच्या कपाळाचा आकार मोठा आहे, सीसीटीव्हीतील व्यक्तीचा लांबी रुंदीला छोटा. शरीफुलचे डोळे बदामाच्या आकाराचे तर सीसीटीव्हीतील व्यक्तीचे गोल आहेत. शरीफुलच्या भुवयांमध्ये कमी अंतर आहे, तर सीसीटीव्हीतील व्यक्तीच्या जास्त. शरीफुलचे नाक रुंदीला मोठे आहे, तर सीसीटीव्हीतील व्यक्तीचे निमुळते. शरीफुलचे ओठ हार्टशेपचे आहेत तर सीसीटीव्हीतील व्यक्तीचे बो शेपमध्ये दिसत आहेत.  

Web Title: Is the Saif Ali khan attacker caught by the police and seen in CCTV different? Forensic lab makes sensational claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.