अभय देओल विदेशी तरुणीसोबत रिलेशनशीपमध्ये? शेअर केलेल्या फोटोवर सनी देओलनं दिली ही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:47 IST2025-10-11T10:45:01+5:302025-10-11T10:47:23+5:30

Abhay Deol : अभय देओल सध्या त्याच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे चर्चेत आला आहे. त्याचा विदेशी तरुणीसोबतचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

Is Abhay Deol in a relationship with a foreign girl? Sunny Deol gave this reaction on the shared photo | अभय देओल विदेशी तरुणीसोबत रिलेशनशीपमध्ये? शेअर केलेल्या फोटोवर सनी देओलनं दिली ही रिअ‍ॅक्शन

अभय देओल विदेशी तरुणीसोबत रिलेशनशीपमध्ये? शेअर केलेल्या फोटोवर सनी देओलनं दिली ही रिअ‍ॅक्शन

अभय देओल बॉलिवूडमधला असा अभिनेता आहे, ज्याने त्याचे प्रत्येक पात्र उत्तमरित्या साकारले आहे. मोजकंच काम केलंय, पण त्या भूमिकेतून त्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आता तो प्रोफेशनल लाइफमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच त्याने विदेशी तरुणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

बॉलिवूडच्या लोकप्रिय कुटुंबातील एक कुटुंब म्हणजे देओल फॅमिली. या कुटुंबातील मुलगा अभय देओल सध्या चर्चेत आला आहे. नुकताच त्याने एका विदेशी तरुणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हायरल फोटोत ते दोघे कोजी मूडमध्ये दिसत आहेत. हा फोटो पाहून त्याचं या तरूणीसोबत अफेयर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र या दोघांपैकी एकानेही या नात्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या विदेशी तरुणीचं नाव अमांडा पाल्मर आहे. जी एक स्वतंत्र कलाकार आणि सिनेमांना सपोर्ट करण्यासाठी एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन चालवते.


सनी देओलनं दिली ही रिअ‍ॅक्शन
भाऊ सनी देओलनं अभयच्या पोस्टवर रिअ‍ॅक्शन दिली आहे. त्याने त्याच्या भावाला विदेशी मुलीसोबत कोजी झालेला फोटो पाहून कमेंटमध्ये हार्ट इमोजी शेअर केली आहे. यासोबतच चाहत्यांनी कमेंट्स करत हे नाते कन्फर्म समजायचं का असे प्रश्न विचारले आहेत.

एका युजरने लिहिले की, तर आपण हे नाते कन्फर्म समजायचं का?, तर दुसऱ्याने या जोडीला परफेक्ट म्हटलं. युजर्स अभय देओलच्या या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मात्र अद्याप अभय आणि अमांडाने त्यांच्या नात्याला दुजोरा दिलेला नाही.

Web Title : क्या अभय देओल विदेशी युवती के साथ रिश्ते में हैं? सनी देओल की प्रतिक्रिया।

Web Summary : अभय देओल की एक विदेशी महिला, अमांडा पाल्मर के साथ तस्वीर से रिश्ते की अफवाहें उड़ीं। भाई सनी देओल ने दिल के इमोजी के साथ प्रतिक्रिया दी। प्रशंसक उत्सुक हैं कि क्या यह आधिकारिक है, हालांकि दोनों में से किसी ने भी रिश्ते की पुष्टि नहीं की है।

Web Title : Abhay Deol in relationship with foreigner? Sunny Deol's reaction.

Web Summary : Abhay Deol's photo with a foreign woman, Amanda Palmer, sparks relationship rumors. Brother Sunny Deol reacted with heart emojis. Fans are curious if it's official, though neither has confirmed the relationship.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.