बागी चित्रपटाची प्रेरणा रामायणापासून - सब्बीर खान
By Admin | Updated: April 27, 2016 19:49 IST2016-04-27T19:49:16+5:302016-04-27T19:49:16+5:30
अभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी बागी या चित्रपटांमध्ये अॅक्शन तर आहेच, मात्र त्याबरोबरच या चित्रपटाची कहाणी पौराणिक कथा रामायणपासून प्रेरणा

बागी चित्रपटाची प्रेरणा रामायणापासून - सब्बीर खान
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - अभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी बागी या चित्रपटांमध्ये अॅक्शन तर आहेच, मात्र त्याबरोबरच या चित्रपटाची कहाणी पौराणिक कथा रामायणपासून प्रेरणा देणारी असल्याचे बागी चित्रपटाचे दिग्दर्शक सब्बीर खान यांनी सांगितले.
निर्माता साजिद नाडियावालाच्या आग्रहाखातर २००४ मध्ये बनविण्यात आलेला तेलगू चित्रपट वर्षम् पाहिल्यानंतर बागी चित्रपट बनविण्याची कल्पना सुचली. बागी चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागला. त्यावेळी पौराणिक कथा रामायणापासून प्रेरणा मिळाली असल्याचे दिग्दर्शक सब्बीर खान यांनी सांगितले. बागी चित्रपटामागे जर रामायणाची प्रेरणा असल्याचे प्रेक्षकांना वाटत नसेल, तर मला काही फरक पडत नाही. प्रेक्षकांना अभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची अॅक्शन पाहण्यात जास्त उत्सुकता असेल, असेही यावेळी सब्बीर खान म्हणाला.
बागी चित्रपट २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.