अधुरी प्रेम कहाणी!, टेलिव्हिजनवरील या ७ अभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमध्ये होता सिद्धार्थ शुक्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 02:51 PM2021-09-02T14:51:42+5:302021-09-02T14:54:04+5:30

टेलिव्हिजनवरील अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

Incomplete love story !, Siddharth Shukla was in a relationship with these 7 actresses on television | अधुरी प्रेम कहाणी!, टेलिव्हिजनवरील या ७ अभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमध्ये होता सिद्धार्थ शुक्ला

अधुरी प्रेम कहाणी!, टेलिव्हिजनवरील या ७ अभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमध्ये होता सिद्धार्थ शुक्ला

googlenewsNext

टेलिव्हिजनवरील अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला आहे. सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस सीझन १३ चा विजेता ठरला होता आणि करिअरच्या यशाच्या शिखरावर होता. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या कमी आहे मात्र बऱ्याच रिलेशनशीप्समध्ये राहून देखील सिद्धार्थ शुक्लाची प्रेम कहाणी अपूर्णच राहिली. जाणून घेऊयात सिद्धार्थ शुक्लाच्या या रिलेशनशीपबद्दल

शहनाज गिल


सिद्धार्थ शुक्लाच्या गर्लफ्रेंड्सची यादी तशी खूप मोठी आहे मात्र जेव्हा त्याच्या लेटेस्ट रिलेशनशीप्सबद्दल बाब समोर येते तेव्हा शहनाज गिलचे नाव घेतले जाते. बिग बॉस हाउसमध्ये त्या दोघांमधील जवळीक वाढली होती. हॅशटॅग #SidNaazKiShaadi गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. मात्र दोघांनी अद्याप लग्न केले नव्हते.

आकांक्षा पुरी


बिग बॉस १३मध्ये जिथे आकांक्षा पुरीसोबत पारस छाब्राचे असलेले रिलेशन चर्चेत आले होते. त्यादरम्यान असे वृत्त समोर आले होते की सिद्धार्थ शुक्लाने आकांक्षा पुरीला डेट केले आहे. पारस छाब्राने स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला होता की सिद्धार्थ आणि आकांक्षा एकमेकांना डेट करत होते. मात्र हे नाते फार काळ टिकू शकले नाही.

शेफाली जरीवाला


अभिनेत्री शेफाली जरीवालाने बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यापूर्वीच या गोष्टीचा खुलासा केला होता की ती आणि सिद्धार्थ शुक्ला रिलेशनशीपमध्ये होते. असे सांगितले जाते की करिअरच्या सुरूवातीला ते दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र ही प्रेम कहाणीदेखील अपूर्णच राहिली.

आरती सिंग


बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्लाची को कंटेस्टंट असलेली आरती सिंगनेदेखील त्याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती, असे सांगितले होते. तिने सांगितले होते की, ती सिद्धार्थ शुक्लासोबत रिलेशनशीपमध्ये राहिली पण त्या दोघांनी लग्न केले नाही.

दृष्टी धामी


टेलिव्हिजन जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये दृष्टी धामीचे देखील नाव घेतले जाते. तिने नीरज खेमासोबत लग्न केले आहे पण ती सिद्धार्थ शुक्लासोबतच्या रिलेशनशीपमुळे खूप चर्चेत आली होती..

Web Title: Incomplete love story !, Siddharth Shukla was in a relationship with these 7 actresses on television

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.