सनीसोबत भूमिकेसाठी इमरानचा नकार
By Admin | Updated: October 22, 2014 04:31 IST2014-10-22T04:31:41+5:302014-10-22T04:31:41+5:30
इमरान हाश्मीच्या आगामी ‘उंगली’ या चित्रपटात त्याच्यावर एक खास प्रमोशनल गाणे शूट करण्यात आले आहे. निर्मात्यांनी या गाण्यात सनी लियोनला घेण्याचा निर्णय घेतला होता

सनीसोबत भूमिकेसाठी इमरानचा नकार
इमरान हाश्मीच्या आगामी ‘उंगली’ या चित्रपटात त्याच्यावर एक खास प्रमोशनल गाणे शूट करण्यात आले आहे. निर्मात्यांनी या गाण्यात सनी लियोनला घेण्याचा निर्णय घेतला होता; पण इमरानला हा निर्णय आवडला नाही. सनी लियोनसोबत काम करायला त्याने नकार दिला. त्यानंतर या गाण्यासाठी श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली. हे गाणे खूूपच शानदार असल्याचे सांगण्यात येत आहे. इमरान आणि श्रद्धा दोघांनीही या गाण्यात चांगला परफॉर्मन्स दिला असल्याचे सांगितले जात आहे. या गाण्याबाबत चित्रपटाची संपूर्ण टीम उत्साहित आहे. येत्या
२८ नोव्हेंबरला चित्रपट रिलीज होत आहे.