इम्रानने प्राचीला दिला आत्मसंयमाचा धडा

By Admin | Updated: April 25, 2016 10:49 IST2016-04-25T10:39:11+5:302016-04-25T10:49:12+5:30

बॉलिवूडमध्ये सीरीयल किसर म्हणून प्रसिध्द असलेल्या इम्रान हाश्मीकडून अभिनेत्री प्राची देसाईने आत्मसंयमाचा धडा घेतला आहे.

Imran gave the title to self rule | इम्रानने प्राचीला दिला आत्मसंयमाचा धडा

इम्रानने प्राचीला दिला आत्मसंयमाचा धडा

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २५ - बॉलिवूडमध्ये सीरीयल किसर म्हणून प्रसिध्द असलेल्या इम्रान हाश्मीकडून अभिनेत्री प्राची देसाईने आत्मसंयमाचा धडा घेतला आहे. आगामी 'अझर' चित्रपटात प्राची आणि इम्रान एकत्र काम करत आहेत. इम्रान कधीही त्याचा संयम सोडत नाही. हा त्याचा गुण घेण्यासारखा आहे असे प्राचीने सांगितले. 
 
त्याच्यासोबत काम करताना त्याच्याकडे इतका संयम कुठून येतो ते कळत नाही. मी त्याच्याकडून ही एक गोष्ट शिकले आहे असे प्राचीने सांगितले. सीनचे कितीही रिटेक द्यावे लागो किंवा तुम्ही त्याला प्रश्च विचारा त्याचा संयम सुटत नाही असे प्राचीने सांगितले. 
 
अझर चित्रपट भारताची माजी क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर आधारीत आहे. अझरच्या आयुष्यात आलेले चढ-उतार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. लारा दत्ता, नर्गिक फाकरी यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. 

Web Title: Imran gave the title to self rule