गायक शंकर महादेवन यांच्या प्रकृतीत सुधारणा
By Admin | Updated: December 8, 2015 11:21 IST2015-12-08T11:18:08+5:302015-12-08T11:21:15+5:30
छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

गायक शंकर महादेवन यांच्या प्रकृतीत सुधारणा
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून काळजीचे काही कारण नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
अर्थमंत्री अरूण जेटली यांची कन्या सोनाली हिच्या विवाहसमारंभास उपस्थित राहण्यासाठी शंकर महादेवन काल दिल्लीत होते. मात्र समारंभादरम्यान अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले व त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचा ईसीजी काढला असता काही काळ रुग्णालयातच थांबण्याचा सल्ला दिला. अखेर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून काळजीचे कारण नाही, असे आज सकाळी डॉक्टरांनी स्पष्ट केले. मात्र खबरदारी म्हणून डॉक्टरांनी शंकर यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.