मराठी तारकांना ‘इम्फा’चे वेध
By Admin | Updated: September 11, 2015 05:15 IST2015-09-11T05:15:33+5:302015-09-11T05:15:33+5:30
वर्षभर विविध चित्रपट, मालिका, नाटकांमधून दमदार अभिनयाची मेजवानी रसिकांना दिल्यानंतर, या कलाकार मंडळींना वेध लागतात, ते अॅवॉर्ड सेरेमनीचे म्हणजेच, अर्थात त्यांनी वर्षभर

मराठी तारकांना ‘इम्फा’चे वेध
वर्षभर विविध चित्रपट, मालिका, नाटकांमधून दमदार अभिनयाची मेजवानी रसिकांना दिल्यानंतर, या कलाकार मंडळींना वेध लागतात, ते अॅवॉर्ड सेरेमनीचे म्हणजेच, अर्थात त्यांनी वर्षभर घेतलेल्या कष्टाबद्दल विविध मान्यवरांकडून होणाऱ्या कौतुक सोहळ्याचे. तसेच, सध्या या तारकांना कलाकार मंडळींना वेध लागले आहेत, ते IMFFA म्हणजेच, ‘इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल अॅवॉर्डस’चे. यंदाचा हा पुरस्कार सोहळा युरोपमध्ये आयोजित केला असून, बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची प्रमुख उपस्थिती येथे असणार आहे. या पुरस्काराच्या परीक्षणाची जबाबदारी मराठीतील दिग्गज कलाकार रोहिणी हट्टंगडी, विक्रम गोखले आणि नुकतेच आॅस्करच्या भारतीय चित्रपटांच्या निवड अध्यक्षपदी नियुक्ती झालेले अमोल पालेकर पार पाडणार आहेत. याशिवाय बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख तयार केलेले मराठमोळे कलाकार ऊर्मिला मातोंडकर, सोनाली बेंद्रे, इशा कोप्पीकर आणि श्रेयस तळपदे हे या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.