इमरानमुळे हुमैमा चिंतित
By Admin | Updated: August 3, 2014 23:32 IST2014-08-03T23:32:51+5:302014-08-03T23:32:51+5:30
दिग्दर्शक कुणाल देशमुखचा आगामी क्राईम कॉमेडी चित्रपट ‘राजा नटवरलाल’ची अभिनेत्री हुमैमा मलिक सहकलाकार

इमरानमुळे हुमैमा चिंतित
दिग्दर्शक कुणाल देशमुखचा आगामी क्राईम कॉमेडी चित्रपट ‘राजा नटवरलाल’ची अभिनेत्री हुमैमा मलिक सहकलाकार आणि बॉलीवूडचा सिरीयल किसर अभिनेता इमरानसोबत काम करण्यास चिंतित होती़ हुमैमा पाकिस्तानी अभिनेत्री आहे़ सुरुवातीला ती इमरान हाश्मीसोबत काम करण्यास तयार नव्हती; परंतु इमरानसोबत काम केल्यावर तिचा दृष्टिकोन बदलला आहे़ हुमैमा म्हणाली की, ‘मला चित्रपटात इमरान हाश्मीची हिरोईन बनण्याची धास्तीच बसली होती़ या चित्रपटाविषयी मला चुकीची धारणा होती़, ही धारणा इमरानचे चित्रपट पाहिल्यावर बनली होती; मात्र जेव्हा मी इमरानला भेटले तेव्हा माझा दृष्टिकोन बदलला़ इमरान हाश्मी फारच लाजरेबुजरे आहेत़ ते एक चांगले पती व पितादेखील आहेत़’ हुमैमा स्वत:ला भाग्यशाली समजते की, इमरानमुळे तिला सर्वोत्कृष्ट भूमिका मिळाली़ हुमैमा म्हणाली की, मी ‘बोल’ चित्रपटात एका पारंपरिक महिलेची भूमिका केली होती़ जी डोक्यावरचा पदरदेखील पडू देत नव्हती़ आगामी चित्रपटात इमरानसोबत किस करण्यास माझे मन तयार नव्हते; मात्र नंतर मी स्वत:ला तयार केले व इमरानच्या स्वभावामुळे मला ते सहज शक्य झाले, असेही ती म्हणाली़