मी रोमँटिक नाही - सलमान खान
By Admin | Updated: November 3, 2015 17:49 IST2015-11-03T17:27:35+5:302015-11-03T17:49:11+5:30
मला आवडलेल्या मुलीच मी संरक्षण आणि अधिक काळजी घेत आसतो ते माझ्या डोळ्यात दिसून येते पण मी रोमँटिक नाही. लोकांमध्ये असताना मी माझ्या प्रियसीचा हात ही पकडू शकत नाही

मी रोमँटिक नाही - सलमान खान
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - मला आवडलेल्या मुलीचं मी संरक्षण करतो तसेच तिची जास्त काळजी घेतो आणि ते माझ्या डोळ्यातही दिसतं पण तरीही मी रोमँटिक नाही. लोकांमध्ये असताना मी माझ्या प्रेयसीचा हात ही पकडू शकत नाही किंवा मी माझं नातं जाहीर व्यक्त करु शकत नाही, असे बॉलिवूडचा दबंग खानने एका मुलाखतित म्हटले आहे. तो 'प्रेम रतन धन पायो'च्या प्रमोशनला आला होता.
मला कँडल लाईट डिनर आवडत नाही, त्याचप्रमाणे जेवण करताना सार्वजिक स्तरावर काढले जाणारे फोटो, सतत लग्नाबद्दल विचारले जाणारे प्रश्न आणि त्यावरून होणारी भांडणे, शाब्दिक चकमक, तोंडावर पडणारा कॅमेऱ्याचा फ्लॅश आपल्याल आवडत नसल्याचं सलमान म्हणाला. मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण करणे मला आवडत नाही. आतापर्यंत मी फक्त दोन वेळा कँडल लाईट डिनर केलं आहे आणि त्या दोन्हीवेळा आपले वादविवाद झाल्याचे सलमानने मोकळेपणाने सांगितले.