'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 13:17 IST2025-10-30T13:16:35+5:302025-10-30T13:17:46+5:30

कोण आहे ही सुंदर अभिनेत्री? अगस्त्य नंदासोबत जमली जोडी

ikkis movie actress simar bhatia starring opposite agastya nanda she is niece of akshay kumar | 'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन

'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचा 'इक्कीस' सिनेमा रिलीज होणार आहे. कालच सिनेमाचा ट्रेलर आला. सिनेविश्वात येणाऱ्या काळात अगस्त्य नंदा प्रॉमिसिंग अभिनेता म्हणून पुढे येईल असा अंदाज सगळेच व्यक्त करत आहेत. 'इक्कीस'या सिनेमात अगस्त्यचा स्क्रीन प्रेझेन्सही लाजबाव दिसत आहे. तर दुसरीकडे सिनेमातील मुख्य अभिनेत्रीनेही लक्ष वेधून घेतलं आहे. कोण आहे ती?

श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्कीस' सिनेमात अगस्त्य नंदाने भारतीय सेना अधिकारी आणि टँक कमांडर परमवीर चक्र अरुण खेत्रपालची भूमिका साकारली आहे. १९७१ साली भारत पाकिस्तान युद्धात अरुण खेत्रपाल वयाच्या केवळ २१ वर्षी शहीद झाले. त्यांच्या  साहसी कामगिरीवर, धाडसावर आणि आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे. अरुण खेत्रपाल यांच्या आयुष्यात एक मुलगीही होती. सिनेमात तिची भूमिका अभिनेत्री सिमर भाटियाने केली आहे. सिमर ही अभिनेता अक्षय कुमारची भाची आहे. अक्षय कुमारची बहीण अलका भाटिया यांची ती मुलगी आहे. अक्षय आणि ट्विंकल खन्ना दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिमरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अक्षय कुमार लिहितो, "माझी छोटी सिमी आता छोटी राहिलेली नाही. घरातील हॉलमध्ये केलेल्या परफॉर्मन्सेसपासून ते आता 'इक्कीस' सिनेमातून ती मोठ्या पडद्यावर झळकत आहे. माझं ऊर अभिमानाने भरुन आलं आहे. आणि अगस्त्य, काय स्क्रीन प्रेझेन्स आहे तुझा! 'इक्कीस'च्या संपूर्ण टीमला खूप यश मिळो."

तर ट्विंकल खन्नाने लिहिले, "आमच्या सिमरने आता फिल्मी दुनियेत प्रवेश केला आहे. किती नॅचरल अभिनय वाटत आहे. एकदम मस्त आमची टॅलेंटेड लिटिल वन"

'इक्कीस' सिनेमातून सिमर भाटिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर अगस्त्य नंदाचा हा दुसरा सिनेमा आहे. त्याने 'द आर्चीज'मधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. डिसेंबरमध्ये 'इक्कीस' रिलीज होणार आहे. मॅडॉक फिल्म्सचे दिनेश विजान यांची सिनेमाची निर्मिती केली आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात धर्मेंद्र, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर यांचीही भूमिका आहे.

Web Title : अगस्त्य नंदा की 'इक्कीस' की अभिनेत्री का खुलासा: अक्षय कुमार से संबंध

Web Summary : अगस्त्य नंदा 'इक्कीस' में अरुण खेत्रपाल के रूप में हैं। अक्षय कुमार की भतीजी सिमर भाटिया एक महत्वपूर्ण भूमिका निभाती हैं। श्रीराम राघवन द्वारा निर्देशित यह फिल्म 1971 के युद्ध के दौरान खेत्रपाल की बहादुरी पर केंद्रित है। अक्षय और ट्विंकल ने सिमर की शुरुआत की सराहना की।

Web Title : Agastya Nanda's 'Ikkis' Actress Revealed: Connection to Akshay Kumar

Web Summary : Agastya Nanda stars in 'Ikkis' as Arun Khetarpal. Simar Bhatia, Akshay Kumar's niece, plays a key role. The film, directed by Sriram Raghavan, focuses on Khetarpal's bravery during the 1971 war. Akshay and Twinkle praised Simar's debut.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.