मी पण होणार पॉर्नस्टार - राखी सावंतचा सनीला टोमणा

By Admin | Updated: February 10, 2016 14:01 IST2016-02-10T13:23:55+5:302016-02-10T14:01:44+5:30

सनी लिऑनवर टीका करण्याची एकही संधी न सोडणा-या राखी सावंतनं आता मी पण पॉर्नस्टार होणार असं खिजवत, सनीला जी काही संधी मिळालीय

I will be watching porn star - Rakhi Sawant's Sunny Tumna | मी पण होणार पॉर्नस्टार - राखी सावंतचा सनीला टोमणा

मी पण होणार पॉर्नस्टार - राखी सावंतचा सनीला टोमणा

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - सनी लिऑनवर टीका करण्याची एकही संधी न सोडणा-या राखी सावंतनं आता मी पण पॉर्नस्टार होणार असं खिजवत, सनीला जी काही संधी मिळालीय ती तिच्या भूतकाळामुळेच असं सांगत पुन्हा चर्चेत राहण्या प्रयत्न केला आहे. सनी लिऑनला मिळणारी प्रसिद्धी, बॉलीवूडचा पाठिंबा आणि सिनेमे कदाचित सहन न झाल्यामुळे आकसापोटी राखी असं बरळत असेल, परंतु आधी मी कधीही पॉर्नस्टार होणार नाही असं सांगणा-या राखीनं आता मात्र, मी बनणार पॉर्नस्टार असं उपहासात्मक वक्तव्य केल्याचं टाइम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे.
याआधीही अनेकवेळा राखीनं सनीला पॉर्नस्टार म्हणून हिणवलं होतं. सनीला भारतात काम करण्यापासून बंदी घालायला हवी अशी मागणीही राखीनं यापूर्वी केली होती. सनीचं काम बघून पुरूष बलात्कारासारखे गुन्हे करायला उद्युक्त होतात असा जावईशोधही राखीनं लावला आणि अंगभर कपडे घातले तरच तिला भारतात काम करण्याची परवानगी द्यावी अशी परस्पर मागणीही राखीनं केली होती.
 
वादग्रस्त वक्तव्यांचा धडाका मायानगरीत आल्यापासून लावलेल्या राकी सावंतचा सनीवरील हल्ला आकसापोटी आहे की प्रसिद्धीसाठी हे तुम्हीच ठरवा!

Web Title: I will be watching porn star - Rakhi Sawant's Sunny Tumna