९ व्या वर्षी माझे लैंगिक शोषण झाले होते - कल्की कोचलीन
By Admin | Updated: April 10, 2015 12:11 IST2015-04-10T11:58:23+5:302015-04-10T12:11:12+5:30
मी नऊ वर्षांची असताना एका पुरुषाने माझे लैंगिक शोषण केले होते असे धीटपणे सांगत कल्कीने लहान मुलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

९ व्या वर्षी माझे लैंगिक शोषण झाले होते - कल्की कोचलीन
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - आपल्या दमदार अभिनयाने बॉलीवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणा-या अभिनेत्री कल्की कोचलीनने आता लहान मुलांच्या शोषणाविरोधात आवाज उठवला आहे. मी नऊ वर्षांची असताना एका पुरुषाने माझे लैंगिक शोषण केले होते असे धीटपणे सांगत कल्कीने लहान मुलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिनेत्री कल्की कोचलीनचा 'मार्गारिट विथ अ स्ट्रॉ' हा सिनेमा येत्या काही दिवसांमध्ये प्रदर्शित होणार असून या सिनेमात कल्कीने सेलेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासलेल्या तरुणीची भूमिका साकारली आहे. या सिनेमाविषयी बोलताना कल्कीने स्वतःवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या कटू आठवणी सांगितल्या. कल्की म्हणते, मी ९ वर्षांची असताना एका पुरुषाने माझ्याशी संबंध ठेवले. भीतीपोटी मी आईवडिलांना हा प्रकार सांगू शकले नाही. ऐवढ्या वर्षांनी या कटू आठवणीला उजाळा देऊन मला लोकांची सहानूभूती नको. पण लैंगिक शोषणासारख्या प्रश्नांवर आपण उघडपणे बोलायला हवे. पालकांनीही या बाबतीत उघडपणे बोलायला हवे असे कल्कीने नमूद केले. कल्कीच्या या धाडसाचे सध्या सोशल मिडीयावर कौतुक होत आहे.