"मी फक्त भूमिका जगते"

By Admin | Published: April 1, 2017 05:01 AM2017-04-01T05:01:41+5:302017-04-01T05:01:41+5:30

कुसुम या मालिकेतील कुमुद, नागीनमधील महीश्मती अशा अनेक व्यक्तिरेखा साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री आशका गोरडिया

"I just play the role" | "मी फक्त भूमिका जगते"

"मी फक्त भूमिका जगते"

googlenewsNext

- Rupali Mudholkar -
कुसुम या मालिकेतील कुमुद, नागीनमधील महीश्मती अशा अनेक व्यक्तिरेखा साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री आशका गोरडिया हा छोट्या पडद्यावरचा ग्लॅमरस चेहरा लवकरच ‘नच बलिये 8’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. अमेरिकन बॉयफ्रेंड ब्रेंट गोबलसोबत ती या शोमध्ये आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहे. याच निमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा...

नच बलिये 8मध्ये एकापेक्षा एक तडगे स्पर्धक आहेत. प्रत्येकाला जिंकायचे आहे. अशा स्थितीत तू या शोबद्दल काय विचार करतेस?
आशका : निश्चितपणे मी या शोसाठी अतिशय उत्सुक आहे. जुन्या लोकप्रिय थीमसह परतलेल्या या सीझनमध्ये डान्स आणि रोमान्स याचा तडका असणार आहे. प्रेक्षकांसाठीच नव्हे, तर माझ्या व बेंटसाठीसुद्धा हा आनंददायी अनुभव आहे. प्रॅक्टिस सेशनमध्ये धम्माल मज्जा-मस्ती शिवाय जीवतोड मेहनत, असे सगळेच आम्ही अनुभवतोय.

आशका, तुझ्या व बेंटबद्दल जाणून घ्यायला चाहते उत्सुक आहेत. बेंटबद्दल बोलायचे झाल्यास त्यातली अशी कुठली गोष्ट आहे, जी तुला सर्वाधिक भावते?
बेंटमधील एक गोष्ट मला सर्वाधिक भावते, ती म्हणजे, त्याची शिकण्याची वृत्ती. कुठलीही गोष्ट तो इतक्या तन्मयतेने आणि विनम्रपणे शिकतो, की त्याला पाहून मला स्वत:चा अभिमान वाटतो. तो माझ्यासोबत आहे, याबद्दल मी स्वत:ला नशीबवान मानते. एखाद्या छोट्याशा बाळाला एखादी नवी गोष्ट दाखवावी, असे भाव कुठलीही गोष्ट शिकताना बेंटच्या चेहऱ्यावर असतात. त्याच्यातील हा निष्पापपणा, नवी गोष्ट आत्मसात करण्यासाठीची त्याची तळमळ मला सर्वाधिक अपील होते.

तू अनेक मालिकांमध्ये सकारात्मक-नकारात्मक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. यांपैकी कुठल्या भूमिका तुला करायला अधिक आवडतात?
माझ्या मते, सकारात्मक किंवा नकारात्मक भूमिका असे काही नसतेच. माझे म्हणाल तर भूमिका ही भूमिका असते. खलनायक साकारणाऱ्या कलाकारही अभिनय करताना स्वत:ला हिरो समजत असतो. कुठलीही एखादी भूमिका कथेत कशी रंग भरते, कथा कशी पुढे नेते, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे माझ्या वाट्याला कुठलीही भूमिका येवो, मी फक्त ती जगते एवढेच.

सोशल मीडियाकडे तू कुठल्या नजरेतून बघतेस?
सोशल मीडियाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे. मी तर असे म्हणेन, की आपली पिढी खरोखरच नशीबवान आहे, की या पिढीला सोशल मीडियासारख्या व्यासपीठावर व्यक्त होण्याची संधी मिळतेय. सोशल मीडियावर दोषारोप करणाऱ्या अनेक लोकांना मी रोज भेटते. पण तरीही, सोशल मीडियाकडे पाहण्याचा माझा सकारात्मक दृष्टिकोन तसूभरही बदलत नाही. माझ्या मते, सोशल मीडिया हा जगभरातील सगळ्या सुंदर गोष्टींचा खजिना आहे. फक्त त्याकडे पाहण्याची दृष्टी तेवढी सुंदर हवी. सेलिब्रिटींचे सेलिब्रेशन लोक बघू शकणार नसतील, तर कसली मज्जा? सोशल मीडियाने हे सेलिब्रेशन करण्याची संधी माझ्यासकट अनेकांना दिली आहे. त्याचे आभार मानायलाच हवेत.


पर्सनल लाईफ व प्रोफेशन लाईफ तू कशी सांभाळतेस?
माझ्या आयुष्यात पर्सनल व प्रोफेशनल लाईफ या दोघांनाही सारखे महत्त्व आहे. खासगी आयुष्य आणि काम या दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यानुसार, मी त्यात संतुलन आणण्याचा प्रयत्न करते. शिवाय, दोघांचीही सरमिसळ होणार नाही, याची काळजी घेते.


तू अनेकांची आवडती अभिनेत्री आहेस. पण आशकाची, सगळ्यात आवडती अभिनेत्री कोण, हे जाणून घेण्यात आम्हाला रस आहे?
रेखाजी, मला खूप आवडता. छोट्या पडद्याबद्दल बोलायचे झाल्यास छोटा पडदा म्हणजे, प्रतिभावान लोकांची खाण आहे. येथे अनेकजणी उत्तम काम करताहेत. पण साक्षीचे काम मला आवडते.

Web Title: "I just play the role"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.