अभिनय करतेय असे वाटतच नाही!

By Admin | Published: June 27, 2016 12:22 AM2016-06-27T00:22:08+5:302016-06-27T00:22:08+5:30

‘चार दिवस सासूचे’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील कविता लाडची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

I do not think acting! | अभिनय करतेय असे वाटतच नाही!

अभिनय करतेय असे वाटतच नाही!

googlenewsNext


‘चार दिवस सासूचे’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील कविता लाडची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. कविता आता ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेत काम करणार आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेविषयी ‘सीएनएक्स’सोबत तिने मारलेल्या गप्पा...
प्रश्न : छोट्या पडद्यावर तू खूपच कमी प्रमाणात काम करतेस असे का? ही मालिका स्वीकारण्यामागचे कारण काय?
4 चांगली भूमिका असल्याशिवाय कोणतीही भूमिका स्वीकारणार नाही, अशी माझी नेहमीच भूमिका असते. कोणतीही मालिका, चित्रपट स्वीकारत असताना त्या मालिकेची टीम कशी आहे, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असते. या मालिकेची निर्मिती संगीत कुलकर्णी यांची असल्याने, मला कोणत्याच बाबतीत शंका नव्हती, तसेच या मालिकेची कथा अद्वैत दादरकर आणि शिरीष लाटकर यांची असल्याने मी मालिकेसाठी लगेचच होकार दिला. या मालिकेत दोन कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोन्ही कुटुंबांचा व्यवसाय एक असून, त्यांचे कौटुंबिक नाते खूपच चांगले आहे. त्यामुळे हे नाते आयुष्यभरासाठी जोडले जावे, असे त्यांना वाटत आहे. आपल्या मुला-मुलींनी लग्न करावे, अशी त्यांची इच्छा आहे. ते दोघांमध्ये चांगली मैत्रीही आहे, पण नात्यात पडण्याचा त्यांनी कधीच विचारही केलेला नाही. ते एकत्र येतात की नाही, हे येणारा काळच ठरवणार आहे.
प्रश्न : या मालिकेतील व्यक्तिरेखेत आणि कवितात किती साम्य आहे?
4या मालिकेतील मला आवडलेली सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे, ही व्यक्तिरेखा साकारताना अनेक वेळा मी अभिनय करत आहे, असे मला वाटतच नाही. या मालिकेत मी एका मुलाच्या आईची भूमिका साकारत आहे. खऱ्या आयुष्यातही मला दोन मुलं आहेत. या मालिकेत मुलगा आणि नवऱ्यामध्ये माझे नेहमीच सँडविज होत असते. दोघांपैकी कोणाची बाजू घेऊ हे मला कळतच नाही. खऱ्या आयुष्यातही मी एक आई असल्याने हा अनुभव मला नेहमीच येत असतो. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे, माझ्या मुलाला सायकल घ्यायची होती, पण पावसात सायकल घेतल्यास ती खराब होईल. त्यामुळे पावसानंतर सायकल घेऊ या असे माझ्या नवऱ्याचे म्हणणे होते, पण मुलाला ती आताच हवी होती. शेवटी मी नवऱ्याला समजावले की, तो पावसात सायकल कमी वापरेल, पण त्याला सायकल घेऊन देऊ या. असे प्रसंग आयुष्यात अनेक वेळा येत असतात. त्यामुळे या मालिकेचे चित्रीकरण करताना मी माझे खरे आयुष्य जगत आहे, असे मला वाटते.
प्रश्न : या मालिकेच्या चित्रीकरणाचा तुझा अनुभव कसा आहे?
4या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेचे चित्रीकरण आम्ही कोणत्याही सेटवर करत नसून, खऱ्याखुऱ्या घरात करत आहोत. त्यामुळे या हे चित्रीकरण इतर मालिकांपेक्षा खूपच वेगळ्या प्रकारे केले जात आहे, तसेच या मालिकेत विघ्नेश जोशी, आनंद काळे हे सहकलाकार आहेत. त्यांच्यासोबत मी आधीही काम केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना मला खूप मजा येतेय, तसेच या मालिकेत अभिजित आमकर, सई घारपुरे ही नवीन मुले आहेत. त्यांना पाहून नवीन पिढी खूप मेहनत घेते, असे मला वाटते.
प्रश्न : छोट्या पडद्याबाबत तुझे काय मत आहे?
4तुम्ही एखादी मालिका करत असता, त्या वेळी प्रेक्षकांना तुमची भूमिका आवडली, तर ते तुम्हाला अक्षरश: डोक्यावर घेतात. प्रेक्षक त्या कलाकारावर नाही, तर त्या व्यक्तिरेखेवर प्रेम करत असतात, पण त्यांची स्मरणशक्ती ही ठरावीक काळासाठी असते. कारण तुम्ही नवीन भूमिका साकारल्यावर प्रेक्षक तुमची जुनी भूमिका विसरून जातात, असे माझे निरीक्षण आहे. त्यामुळे छोट्या पडद्यामुळे तुम्ही एका व्यक्तिरेखेत अडकले जाता, असे म्हटले जाते हे चुकीचे आहे असे मला वाटते. या छोट्या पडद्यामुळे आम्हा कलाकारांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळते.
प्रश्न : या मालिकेत तुझ्या मुलाला अभिनयाची आवड आहे, पण तुझे पती त्याच्या या आवडीच्या विरोधात आहेत, असे दाखवण्यात आले आहे. करिअरच्या बाबतीत मुलांना मोकळीक द्यावी की नाही, याबाबत तुला काय वाटते?
4प्रत्येक व्यक्तीला आपले करिअर निवडण्याची संधी द्यावी, असे माझे मत आहे. मला नाटकात काम करायचे, असे ज्या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले होते, त्या वेळी चांगल्या कुटुंबातील मुली नाटकात काम करत नाहीत, असे वडिलांचे म्हणणे होते, पण मला अभिनयाची आवड असल्याने मी नाटकात काम करणे सुरूच ठेवले. मला चांगल्या कलाकारांसोबत काम करायची संधी मिळायला लागल्यावर त्यांचे मत बदलत गेले. तुम्ही तुमच्या आवडीचे काम निवडले, तर ते तुम्ही ते अधिक आवडीने करता असे मला वाटते.

- prajakta.chitnis@lokmat.com

 

Web Title: I do not think acting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.