कौटुंबिक चित्रपटांसाठी मी योग्य नाही : इमरान
By Admin | Updated: August 2, 2014 23:44 IST2014-08-02T23:44:54+5:302014-08-02T23:44:54+5:30
अनेक प्रकारच्या थ्रिलर मूव्हीत काम करणा:या इमरान हाश्मीला अशा प्रकारच्या चित्रपटांत पाहणो प्रेक्षकांना आवडते. त्यामुळे इमरान स्वत:ला सोशल किंवा फॅमिली ड्रामा चित्रपटांसाठी योग्य मानत नाही.

कौटुंबिक चित्रपटांसाठी मी योग्य नाही : इमरान
अनेक प्रकारच्या थ्रिलर मूव्हीत काम करणा:या इमरान हाश्मीला अशा प्रकारच्या चित्रपटांत पाहणो प्रेक्षकांना आवडते. त्यामुळे इमरान स्वत:ला सोशल किंवा फॅमिली ड्रामा चित्रपटांसाठी योग्य मानत नाही. त्याने आजवर एकता कपूर, रॉनी स्क्रुवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूरसारख्या निर्मात्यांसोबत काम केले आहे. त्याशिवाय त्याने त्याचे मामा महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांच्या हॉरर चित्रपटांमध्येही काम केले आहे. इमरानला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, त्याला सूरज बडजात्यांच्या चित्रपटांत काम करायला आवडेल का, तेव्हा त्याचे उत्तर होते, ‘नाही, ते खूप चांगले चित्रपट बनवतात; पण मी त्यांच्या चित्रपटासाठी योग्य नाही.’