‘वाडा चिरेबंदी’ची शंभरी
By Admin | Updated: November 27, 2015 01:56 IST2015-11-27T01:56:41+5:302015-11-27T01:56:41+5:30
प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांची सिद्धहस्त लेखणी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचे दिग्दर्शन या समीकरणातून रंगमंचावर सादर होत असलेल्या

‘वाडा चिरेबंदी’ची शंभरी
प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांची सिद्धहस्त लेखणी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचे दिग्दर्शन या समीकरणातून रंगमंचावर सादर होत असलेल्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाने 100 प्रयोगांचा टप्पा नुकताच पूर्ण केला. तब्बल वीस वर्षानंतर हे नाटक पुन्हा रंगमचावर आले असले तरी यालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या नाटकाचा विषय पाहिला तर तसा 1980च्या दशकातला. घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर इतर सदस्यांमध्ये निर्माण होणारा आंतरिक, भावनिक आणि वैयक्तिक संघर्ष व त्यातून एकत्र कुटुंब पद्धतीला लागलेले भडदाड यावर हे नाटक भाष्य करते. निवेदिता जोशी, वैभव मांगले, प्रसाद ओक, नेहा जोशी, भारती पाटील आणि सिद्धधेश्वर झाडबुके या कलाकारांनी जबरदस्त अभिनयातून हे नाटक प्रेक्षकांच्या हदयापर्यंत पोहोचविले आहे.