हृतिकची शाहरुखला 'टफफाईट'

By Admin | Updated: January 30, 2017 17:12 IST2017-01-30T17:09:00+5:302017-01-30T17:12:41+5:30

काबिलनेही चांगला व्यवसाय केला आहे. दोन्ही चित्रपट प्रेक्षकवर्गाला चित्रपटगृहाकडे आणण्यात यशस्वी ठरले आहेत.

Hrithik's Shahrukhla 'Tuffaheet' | हृतिकची शाहरुखला 'टफफाईट'

हृतिकची शाहरुखला 'टफफाईट'

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 30 - मागच्या आठवडयात प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा रईस आणि हृतिक रोशनचा काबिल या दोन चित्रपटांमध्ये रईसने बाजी मारली असली तरी, काबिलनेही चांगला व्यवसाय केला आहे. दोन्ही चित्रपट प्रेक्षकवर्गाला चित्रपटगृहाकडे आणण्यात यशस्वी ठरले आहेत. 
 
रईस 100 कोटीच्या क्लबमध्ये सहभागी होण्याच्या वाटेवर असून, या चित्रपटाने आतापर्यंत 90 ते 92 कोटींची कमाई केली आहे तर हृतिकच्या काबिलने 69 ते 70 कोटींचा व्यवसाय केला आहे. रईसला जास्त चित्रपटगृहे मिळाल्याचा फायदा झाला आहे तर, काबिल चित्रपटाला माऊथ पब्लिकसिटी फायद्याची ठरली आहे. 
 
रईसला 3200 स्क्रिन्स मिळल्या आहेत त्याच काबिलला 2200 स्क्रिन्स मिळाल्या आहेत. जास्त स्क्रिन्स मिळण्याचा रईसला फायदा होत आहे. वीकएंडचा बिझनेस नजरेसमोर ठेऊन दोन्ही चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित झाले. 

Web Title: Hrithik's Shahrukhla 'Tuffaheet'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.