हृतिक रोशन हृदयांतर चित्रपटात
By Admin | Updated: March 4, 2017 02:19 IST2017-03-04T02:19:56+5:302017-03-04T02:19:56+5:30
विक्रम फडणवीस दिग्दर्शित करत असलेल्या ‘हृदयांतर’ या चित्रपटात हृतिक रोशन काम करणार आहे.

हृतिक रोशन हृदयांतर चित्रपटात
विक्रम फडणवीस दिग्दर्शित करत असलेल्या ‘हृदयांतर’ या चित्रपटात हृतिक रोशन काम करणार आहे. हृतिकची मराठी चित्रपटात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हृतिकने ट्वीट करून याबद्दल स्वत: सांगितले आहे. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘काल मी माझा जवळचा मित्र विक्रम फडणीसच्या हृद्यांतर या चित्रपटासाठी खूप चांगल्या कलाकारांसोबत चित्रीकरण केले.’ तसेच त्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. हृदयांतर चित्रपटाची कथा हृदयस्पर्शी असून या चित्रपटात सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एका दाम्पत्याची त्यांच्या वैवाहिक जीवनातली वादळांशी असलेली झुंज दाखवणारा हा सिनेमा आहे.