मराठीतील हॉरर मूव्ही ‘अगम्य’

By Admin | Updated: December 10, 2015 02:09 IST2015-12-10T02:09:51+5:302015-12-10T02:09:51+5:30

सध्या मराठी चित्रपटसृष्टीने कात टाकली असून, वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध होत आहे. मराठीत आतापर्यंत 'हॉरर' चित्रपट फारसे झाले नव्हते,

Horror Movie 'Apajya' in Marathi | मराठीतील हॉरर मूव्ही ‘अगम्य’

मराठीतील हॉरर मूव्ही ‘अगम्य’

सध्या मराठी चित्रपटसृष्टीने कात टाकली असून, वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध होत आहे. मराठीत आतापर्यंत 'हॉरर' चित्रपट फारसे झाले नव्हते, परंतु ती पोकळी आता 'अगम्य' या आगामी चित्रपट भरून काढणार आहे. 'अगम्य' हा कदाचित मराठीतील पहिला 'हॉरर' चित्रपट असेल, असा दावा निर्माता-दिग्दर्शकांनी केला आहे. विशेष म्हणजे, सुप्रसिद्ध लेखक आणि अभिनेते अभिराम भडकमकर हे बऱ्याच काळानंतर 'अगम्य' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाविषयी भडकमकर सांगतात, ‘आतापर्यंत मी बऱ्याच कॉमेडी चित्रपटांचे लेखन केले, त्यामुळे कॉमेडी भूमिकाच माझ्या वाट्याला आल्या. मात्र, 'अगम्य' चित्रपटातून मी प्रथमच गंभीर आणि रहस्यमय भूमिका करीत आहे. लेखक-दिग्दर्शक निहार राजहंस आणि सिद्धेश कुलकर्णी जेव्हा माझ्याकडे आले आणि त्यांनी जेव्हा मला या चित्रपटाची संकल्पना सांगितली, तेव्हा मला ती खूप आवडली. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. चित्रपटाचे लेखक निहार राजहंस आणि दिग्दर्शक सिद्धेश कुलकर्णी, तसेच ओंकार कर्वे आणि केतन पेंडसे हे चित्रपटातील अन्य प्रमुख कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. ओंकार कर्वे आणि नवोदित अभिनेता केतन पेंडसे यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 'भूतां'वर आधारित असला, तरी विद्रूप चेहऱ्यांची भूते दाखवून, आम्ही हा 'हॉरर' चित्रपट तयार केला नाही, तसेच गाण्यांमुळे 'रहस्य' भीतिदायक होण्यास मदत होत असली, तरी या चित्रपटात एकही गाणे नाही,’ तसेच ‘या चित्रपटात मुख्य नायिकाही दिसणार नाही,’ असे दिग्दर्शक सिद्धेश कुलकर्णी यांनी या वेळी सांगितले. हा चित्रपट दोन भागांत तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती दिली. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले.

Web Title: Horror Movie 'Apajya' in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.