WATCH : वुल्वोरिन ‘लोगन’चे फर्स्ट ट्रेलर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 16:43 IST2016-10-21T16:32:28+5:302016-10-21T16:43:02+5:30

‘वुल्वोरिन’चे चाहते ज्या गोष्टीची आतूरतेने वाट पाहत होते, त्या ‘लोगन’ सिनेमाचे ट्रेलर इंटरनेटवर दाखल झाले.

WATCH: The first trailer of Wolverine 'Logan' is filed | WATCH : वुल्वोरिन ‘लोगन’चे फर्स्ट ट्रेलर दाखल

WATCH : वुल्वोरिन ‘लोगन’चे फर्स्ट ट्रेलर दाखल

ुल्वोरिन’चे चाहते ज्या गोष्टीची आतूरतेने वाट पाहत होते, त्या ‘लोगन’ सिनेमाचे ट्रेलर इंटरनेटवर दाखल झाले. ह्यु जॅकमन स्टारर या सिनेमात आपल्या वयस्कर ‘वुल्वोरिन’ पाहायला मिळणार. वुल्वोरिन सिरीजमधील हा शेवटचा चित्रपट असल्यामुळे चाहत्यांमध्ये याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

ट्रेलरमध्ये लोगन (ह्यु जॅकमन ) एकदम वयस्कर असून पहिल्याप्रमाणे बलवान राहिलेला नाही. पांढऱ्या पडत चाललेल्या दाढीमध्ये तो पूर्वीचा वुल्वोरिन वाटत नाही. ‘प्रोफेसर एक्स’सोबत मिळून लोगन एका म्युटंट मुलीला मदत करताना दिसतो.

ट्रेलर पाहताना मात्र सुपरहीरो अ‍ॅक्शन सिनेमा आवडणाऱ्या प्रेक्षकांचा हिरमोड होऊ शकतो. कारण हा चित्रपट गंभीर आणि अधिक डार्क आहे. इतर अ‍ॅक्शनपटांसारखा दिखावा आणि भव्यता यात दिसत नाही. पण सर्वाधिक खटकतो तो ह्यु जॅकमन.

SEE : ह्यु जॅकमनचा ‘वुल्वोरिन ३’ लूक


ब्रायन सिंगर दिग्दर्शित ‘एक्स-मेन’ सिनेमांत ज्या प्रमाणे जॅकमन ‘वुल्वोरिन’च्या व्यक्तिरेखेत उठून दिसतो, त्याचा तो स्वॅगर या ट्रेलरमध्ये गायब आहे. त्याच्या डाय हार्ड फॅन्स कदाचित यामुळे नाराज होऊ शकतात. परंतु केवळ ट्रेलर पाहून संपूर्ण चित्रपटाबद्दल अंदाज बांधणे बरोबर नाही.

चित्रपट कसा आहे हे येत्या तीन मार्च रोजी प्रदर्शित झाल्यावर कळेलच. तोपर्यंत तुम्ही ट्रेलरचा आनंद घ्या...

Web Title: WATCH: The first trailer of Wolverine 'Logan' is filed