Venom Trailer2: युट्यूबवर Venomचा धुमाकूळ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 18:06 IST2018-08-02T18:04:20+5:302018-08-02T18:06:59+5:30
Venom Trailer 2: ब्रिटीश अभिनेता टॉम हार्डीचा Venom हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तत्पूर्वी या चित्रपटाच्या ट्रेलरने यु-ट्यूबवर धुमाकूळ घातला आहे.

Venom Trailer2: युट्यूबवर Venomचा धुमाकूळ!!
ब्रिटीश अभिनेता टॉम हार्डीचा Venom हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तत्पूर्वी या चित्रपटाच्या ट्रेलरने यु-ट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत १ कोटी ७२ लाखांवर लोकांनी हा ट्रेलर पाहिलायं. सध्या यु-ट्यूबवर हा ट्रेलर दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करतोय. या चित्रपटात टॉम हार्डीने एडी ब्रोक या पत्रकाराशी भूमिका साकारली आहे. एडी ब्रोक एका एलियनच्या संपर्कात येतो असे याचे कथानक आहे. ट्रेलर बघता, ही एका व्यक्तिच्या आतील दोन व्यक्तिमत्वांची कथा असल्याचे दिसते. यातील एक सामन्य माणूस आहे आणि दुसरा खलनायक. १९८८ मध्ये मारर्वेल कॉमिक्सने वेनम या काल्पनिक पात्रास जन्म दिला होता.
हा चित्रपट टॉम हार्डीने का स्वीकारला यामागे एक गोड कारण आहे. होय, अलीकडे एका मुलाखतीत खुद्द टॉमने याचा खुलासा केला होता. माझा मुलगा वेनमचा खूप मोठा चाहता आहे. मी हा चित्रपट स्वीकारण्यामागे माझा मुलगा हेच एकमेव कारण आहे. जे माझा मुलगा पाहू शकेल, असे काही मला करायचे होते. या चित्रपटात वूडी हॅरलसन, रिज अहमद, मिशेल विलियम्स, जेनी स्लेट आणि स्कॉट हेजसारखे कलाकार आहेत. ५ आक्टोबर २०१८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.
तेव्हा तुम्हीही Venom हा ट्रेलर पाहा आणि कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.