ट्रेनचा प्रवास अन् रंजक ट्विस्ट; ओटीटीवरील 'हा' मर्डर-मिस्ट्री सिनेमा पाहून डोक्याचा होईल भुगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 16:13 IST2025-09-28T16:08:46+5:302025-09-28T16:13:14+5:30
ट्रेनचा प्रवास अन् रंजक ट्विस्ट; ओटीटीवरील 'हा' मर्डर- मिस्ट्री सिनेमा पाहून डोकं चक्रावेल

ट्रेनचा प्रवास अन् रंजक ट्विस्ट; ओटीटीवरील 'हा' मर्डर-मिस्ट्री सिनेमा पाहून डोक्याचा होईल भुगा
OTT Movies: ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे जगभरातील सिनेरसिकांना मनोरंजनाचं एक नवं माध्यम खुलं झालं आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या पद्धतीचा कंटेट सहज उपलब्ध झाला आहे. अलिकडे ओटीटीवर क्राइम थ्रिलर, मर्डर-मिस्ट्री चित्रपटांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळतेय. कलाकारांचा उत्तम अभिनय आणि चित्रपटातील रंजक ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. सध्यातरी लोकांमध्ये या डिजीटल प्लॅटफॉर्मची क्रेझ खूप वाढली आहे, असं चित्र सर्वत्र पाहायला मिळतंय.
सध्या ओटीटी या माध्यमावर प्रेक्षकांना सर्वाधिक आवडणाऱ्या चित्रपटांमध्ये काईम थ्रिलर, मर्डर मिस्ट्री जॉनर अव्वल स्थानवर आहे. अशाची एका चित्रपटाची ओटीटीवर चर्चा आहे. या चित्रपटात येणारे ट्विस्ट शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे आहेत.
काय आहे चित्रपटाचं नाव?
१ तास ४५ मिनिटांच्या या चित्रपटाचं नाव 'मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस' असं आहे. हा एक हॉलिवूड मर्डर मिस्ट्री सिनेमा आहे. केनेथ ब्राघान यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या बहुचर्चित चित्रपटामध्ये टॉम बेटमॅन, पेनोलेप क्रूझ, जुडी डेंच आणि जॉनी डेप या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.तुम्ही जर हा चित्रपट पाहायला सुरुवात केली तर तुमची स्क्रिनवरुन नजर हटणार नाही.'मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस' या हॉलिवूड चित्रपटाचं कथानक एक गुप्तहेर आणि त्याच्या खुनाच्या रहस्याभोवती फिरणार आहे. हा जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मर उपलब्ध आहे.