सिंगर पिंकला वजन वाढल्याचा वाटतोय अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 21:42 IST2017-02-12T16:12:50+5:302017-02-12T21:42:50+5:30
आपल्या फिगरबाबत सतर्क असणारे कलाकार थोडेसे वजन वाढले की, कमालीचे चिंतेत असतात. परंतु यास गायिका पिंक अपवाद आहे. गर्भावस्थेदरम्यान ...

सिंगर पिंकला वजन वाढल्याचा वाटतोय अभिमान
आ ल्या फिगरबाबत सतर्क असणारे कलाकार थोडेसे वजन वाढले की, कमालीचे चिंतेत असतात. परंतु यास गायिका पिंक अपवाद आहे. गर्भावस्थेदरम्यान वाढलेले वजन अजूनही कमी झाले नसल्याने तिला स्वत:वर अभिमान वाटत आहे. विशेष म्हणजे वजन वाढीची तिच्या चेहºयावर कुठल्याही प्रकारची चिंता दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पेजसिक्स डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय पिंकने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात जॅमसन मून नावाच्या मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर पहिल्यांदाच ती गेल्या सोमवारी जीममध्ये बघावयास मिळाली. यावेळी तिचे वजन वाढलेले स्पष्टपणे दिसत होते. परंतु तिच्या चेहºयावर कुठल्याही प्रकारची चिंता दिसत नव्हती.
![]()
याविषयी तिने इन्स्टाग्रामवर लिहिले की, पहिला दिवस! आता वर्कआउट सुरू करावे लागले. प्रेग्नेंसीनंतरच्या सहा आठवड्यांनंतरही मी वजन कमी करण्याचा विचार केला नाही. विशेष म्हणजे या विचाराने मी चितेंतही नाही. पिंकला पती कॅरी हार्टपासून जॅमसन हा दुसरा मुलगा आहे. या दाम्पत्याला पाच वर्षाची विलो सेज नावाची मुलगी आहे.
काही दिवसांपूर्वी पॉपस्टार लेडी गागा हिने एका कार्यक्रमात केलेल्या जरबदस्त परफॉर्मनंतर तिच्या फिगरवरून तिला लक्ष केले होते. परफॉर्म करताना लेडी गागाचे पोट बाहेर आलेले दिसत असल्याचे टीकाकारांनी म्हटले होते. यावेळी पिंक हिने लेडी गागाचे समर्थन करीत टीकाकारांना उत्तर दिले होते. लेडी गागा ही एक सर्वोत्तम गायिका असून, तिच्याविषयी अशाप्रकारची टीका करणे अयोग्य असल्याचे ती म्हटले होते. सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट शेअर करून तिने गागाचे समर्थन केले होते.