SHOCKING: काय सांगता? मायली सायरसने घरी केली लक्ष्मी पूजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 19:14 IST2017-02-06T13:43:41+5:302017-02-06T19:14:31+5:30

सगळी अमेरिका जेव्हा ‘सुपर बॉऊल’ पाहण्यात दंग होती तेव्हा मायली तिच्या घरी लक्ष्मी पूजा करण्यात मग्न होती. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर पारंपरिक हिंदू पद्धतीने बसवण्यात आलेल्या लक्ष्मी पूजेचा फोटो शेअर केला.

SHOCKING: What? Miley Cyrus Koli Lakshmi Pooja at home! | SHOCKING: काय सांगता? मायली सायरसने घरी केली लक्ष्मी पूजा!

SHOCKING: काय सांगता? मायली सायरसने घरी केली लक्ष्मी पूजा!

चून आश्चर्य वाटले ना? अहो बातमीच तशी आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायिका मायली सायरसने चक्क तिच्या घरी हिंदु रितीरिवाजाप्रमाणे लक्ष्मी पूजा केली. सगळी अमेरेका जेव्हा ‘सुपर बॉऊल’ पाहण्यात दंग होती तेव्हा मायली तिच्या घरी लक्ष्मी पूजा करण्यात मग्न होती. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर पारंपरिक हिंदू पद्धतीने बसवण्यात आलेल्या लक्ष्मी पूजेचा फोटो शेअर केला.

या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘सुपर बॉऊलऐवजी मी ‘फ्रुट बॉऊल’ला प्राधान्य दिले.’ 
 

तिने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये मॅलिबू बीचवरील घर पूजेसाठी फुलांच्या पाकळ्या व दिव्यांनी सजवलेले दिसते.
 

‘सुपर बाऊल’च्या दिवशी ती घरामध्ये कुशन घेऊन जाताना दिसली. या वेळी तिने राखाडी रंगाची हुडी घातलेली होती. त्यावर इंद्रधनुष्याचा फोटो आणि ‘वन लव्ह’ असे लिहिलेले होते. शिवाय तिचे केस लांब पोनीटेलमध्ये तिचे केस मागे बांधलेले होत तर कानात मोठ्या हुप रिग्स होत्या. 

                                Miley Cyrus
                                miley

सध्या अ‍ॅक्टर लियाम हेम्सवर्थला डेट करीत असलेल्या मायलीने ही पूजा का ठेवली होती याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

टॅटूपे्रमी मायलीला हिंदू धर्माबद्दल प्रचंड आकर्षण आहे. म्हणून तिच्या हातावर तिने ‘कर्म’ आणि ‘ऊँ’ असे टॅटू आहेत. पूर्व ‘हॅना मोन्टेना’ स्टार मायली नेहमी वादात अडकलेली असते. अलिकडेच तिने विधान केले होते की, ‘जोपर्यंत ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत मी लग्न करणार नाही.’

वादग्रस्त डान्स स्टेप्स आणि विधानांसाठी प्रसिद्ध मायली कधी काय करेल हे कोणीच सांगू शकत नाही. परंतु तिच्या अशा बिनधास्त वागण्यामुळे तर ती जगभरातील चाहत्यांना आवडते.

Web Title: SHOCKING: What? Miley Cyrus Koli Lakshmi Pooja at home!