Shocking : आयरन मॅनचा सूट गेला चोरीला; सूटची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 22:09 IST2018-05-10T16:39:06+5:302018-05-10T22:09:06+5:30
आता ही बातमी वाचून तुम्हालाही झटका बसेल की, अखेर असे झालेच कसे? एवढी मोठी चूक ती पण सुपरहिरोच्या सूटसोबत? ...

Shocking : आयरन मॅनचा सूट गेला चोरीला; सूटची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल?
आ ा ही बातमी वाचून तुम्हालाही झटका बसेल की, अखेर असे झालेच कसे? एवढी मोठी चूक ती पण सुपरहिरोच्या सूटसोबत? असो, आता आम्ही तुम्हाला नेमके काय घडले याविषयी सांगणार आहोत. हॉलिवूड चित्रपटांमधील सुपरहिरो आयरन मॅनची भूमिका साकारणाºया रॉबर्ट डाउनी ज्यूनियरचा खराखुरा आयरन मॅन सूट चक्क चोरीला गेला आहे. लॉस एंजिलिस पोलिसांनीच या बातमीला दुजोरा दिला आहे.
पोलिसांनी सांगितले की, ‘रॉबर्ट डाउनी ज्यूनियरच्या माध्यमातून २००८ मध्ये ‘ओरिजनल सुपरहिरो’ या चित्रपटात परिधान करण्यात आलेला गोल्ड अॅण्ड रेड सूट चोरीला गेला आहे. गेल्या मंगळवारी स्टोरेज फॅसेलिटीमधून हा सूट गायब करण्यात आला आहे. असे म्हटले जात आहे की, पोलिसांना जेव्हा ही माहिती कळाली तेव्हा त्यांची एकच धावपळ झाली. क्रिस्टोफर नो यांनी सांगितले की, ‘या चोराचा शोध घेणे आमची प्राथमिकता आहे. सध्या चोराचा कुठल्याही प्रकारचा सुगावा लागलेला नाही. लॉस एंजिलिसच्या उत्तरेत असलेल्या पकोइमाच्या प्रॉप स्टोरेज वेअरहाउसमध्ये फेब्रुवारी ते २५ एप्रिल दरम्यान हा सूट चोरण्यात आला आहे.
![]()
हा सूट खूप महागडा असून, त्याची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, या सूटची किंमत ३,२५,००० डॉलर म्हणजेच २.१८ कोटी रुपये इतकी आहे. २००८ मध्ये पहिल्यांदा आयरन मॅनच्या रूपात रॉबर्ट डाउनी याने हा सूट परिधान केला. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून, चोर पकडण्यात ते यशस्वी होतील काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.