SEE PHOTO:पॉप गायिका बेयोंसे ने इंस्टाग्रामवर पोस्ट केले न्युड प्रेग्नंसी फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 13:17 IST2017-02-04T07:12:24+5:302017-02-04T13:17:31+5:30

प्रिवेडिंग फोटोशूट, वेडिंग फोटोशूट या ट्रेंडनंतर प्रेग्नंसी फोटोशूट हा ट्रेंडही संध्या सेट होत असल्याचे पाहायला मिळतंय. परदेशात प्रेग्नंसी फोटोशूट ...

SEE PHOTO: Pop singer Beyonce posted on Instagram, Nude Pregnancy Photoshoot | SEE PHOTO:पॉप गायिका बेयोंसे ने इंस्टाग्रामवर पोस्ट केले न्युड प्रेग्नंसी फोटोशूट

SEE PHOTO:पॉप गायिका बेयोंसे ने इंस्टाग्रामवर पोस्ट केले न्युड प्रेग्नंसी फोटोशूट

रिवेडिंग फोटोशूट, वेडिंग फोटोशूट या ट्रेंडनंतर प्रेग्नंसी फोटोशूट हा ट्रेंडही संध्या सेट होत असल्याचे पाहायला मिळतंय. परदेशात प्रेग्नंसी फोटोशूट करणे काही नवीन प्रकार नसून तो तिकडे सेट झालेला ट्रेंड आहे.त्यामुळे हॉलिवूडमधली अनेक स्टारचे चक्रावून टाकतील असे फोटोशूट सोशलमीडियावर व्हायरल होतात.लोकप्रियतेच्या यादीत गायिका सेलिना गोमेजलाही पछाडत पॉप गायिका बेयोंसे नोल्स हीने आपले स्थान निर्माण केले होते. नुकतेच पॉप स्टार गायिका बेयोंसे नोल्स प्रेग्नंट असल्याचे सांगत बेबीबंप शो करत चक्क न्युड फोटो अपलोड केले आहेत. 



विशेष म्हणजे हे फोटो लवकरच जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचेही तिने म्हटले आहे.सध्या बेयोंसे आपली प्रेग्नंसी एन्जॉय करतेय.प्रेग्नंसीचे दिवस नेहमी स्मरणात राहावेत यासाठी तिने हे बोल्ड फोटोशूट केल्याचे तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या फोटोशूट साठी तिने अंडवॉटर पोजही दिल्या आहेत. तिने हे प्रेग्नेंसी फोटो पोस्ट करताच काही तासातच 63.3 लाख लोगों तिचे हे फोटोशूटला पसंती दर्शवली आहे. बेयोंसेच्या प्रेग्नंसीची बातमी वाचताच तिच्यावर  शुभेंच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. बेयोंसेच्या पोस्टनंतर  एक तासात तिला  चाहत्यांकडून  24.3 लाख लाइक आणि 166,000 कमेंट  केलेल्या गेल्या आहेत. 



अमेरिकेच्या लोकप्रिय  पॉप  गायिका  बेयोंसे ने इंस्टाग्रामवर आपली आनंदाची बातमी पोस्ट करताना म्हटले आहे की, “ आम्हाला आमचीही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर करून खूप आनंदत झाला आहे. चाहत्यांकडून मिळणा-या शुभेच्छांच्या रूपात आशिर्वाद मिळाले आहेत. लवकरच आमच्या कुटुंबात आणखी दोन सदस्य जुडणार असल्यामुळे आम्ही आमचा आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही आहोत. इतका आनंद पूर्वी कधीच झाला नव्हता जो आज होतोय. सर्वांनी आमच्या आनंद सहभागी होत जे काही प्रेम दिले आहे ते असे असू द्या म्हणत आभार मानले आहेत. 

Web Title: SEE PHOTO: Pop singer Beyonce posted on Instagram, Nude Pregnancy Photoshoot