संजय दत्तचा ढॉंसू अंदाज, पुन्हा एकदा करणार तगडी मारधाड! नव्या सिनेमाचा भन्नाट टिजर बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 15:09 IST2024-05-15T15:06:50+5:302024-05-15T15:09:38+5:30
संजय दत्त केजीएफनंतर पुन्हा एकदा साऊथ सिनेमात अॅक्शन करताना दिसणार आहे. या आगामी सिनेमाचा टीझर बघाच (sanjay dutt)

संजय दत्तचा ढॉंसू अंदाज, पुन्हा एकदा करणार तगडी मारधाड! नव्या सिनेमाचा भन्नाट टिजर बघाच
बॉलिवूडमध्ये संजूबाबा म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे संजय दत्त.संजय दत्तचे सिनेमे म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी असते. संजूबाबाच्या नव्या सिनेमाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. संजय दत्त गेल्या वर्षी आपल्याला 'जवान' आणि 'लिओ' या सुपरहिट सिनेमांत दिसला. आता संजय दत्तच्या नवीन सिनेमाचा टिझर रिलीज झालाय. DOUBLE ISMART SHANKAR असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा धमाकेदार टिझर रिलीज झालाय.
संजय दत्त यांच्या आगामी DOUBLE ISMART SHANKAR (डबल इस्मार्ट शंकर) चा टिझर भेटीला आलाय. 'इस्मार्ट शंकर' या गाजलेल्या सिनेमाचा हा सीक्वेल आहे. टिझरची सुरुवात एका व्हॉईसओव्हरने होते. राम उस्ताद उर्फ इस्मार्ट शंकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यावेळी त्याला संजय दत्तने साकारलेल्या खलनायकाचा सामना करावा लागणार आहे. संजय दत्त 'केजीएफ' नंतर पुन्हा एकदा दे मार अॅक्शन अंदाजात पाहायला मिळतोय.
संजय दत्तचा स्टायलिश लूक आणि पोशाख त्याचं व्यक्तिमत्व आणखी आकर्षक करतोय. सिनेमात राम पोथीनेनी प्रमुख भूमिकेत आहे. तर अभिनेत्री काव्या थापर फीमेल लीड म्हणून बघायला मिळतेय. टिझरच्या शेवटी महादेवाची भक्ती करणारे साधू पाहायला मिळत असून, शेवटचा प्रसंग रोमांचकारक आहे. पुरी जगन्नाथ यांनी सिनेमाचंं दिग्दर्शन केलंय. हा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर बघायला मिळेल.