डेनियल लॉयटला होतोय प्लॅस्टिक सर्जरीचा पश्चात्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 21:51 IST2017-01-05T21:51:36+5:302017-01-05T21:51:36+5:30

हॉलिवूडमध्ये मेकओव्हर करण्यासाठी अभिनेत्री सर्रासपणे प्लॅस्टिक सर्जरी करीत असतात. आपल्या लूकमध्ये आणखी आकर्षकता आणण्यासाठी त्यांचा हा खटाटोप असतो. मात्र ...

Repentance of plastic surgery due to Daniel Loyat | डेनियल लॉयटला होतोय प्लॅस्टिक सर्जरीचा पश्चात्ताप

डेनियल लॉयटला होतोय प्लॅस्टिक सर्जरीचा पश्चात्ताप

लिवूडमध्ये मेकओव्हर करण्यासाठी अभिनेत्री सर्रासपणे प्लॅस्टिक सर्जरी करीत असतात. आपल्या लूकमध्ये आणखी आकर्षकता आणण्यासाठी त्यांचा हा खटाटोप असतो. मात्र मॉडल तथा अभिनेत्री डेनियल लॉयट हिला प्लॅस्टिक सर्जरी केल्याचा पश्चात्ताप होत आहे. 

डेनियलने सांगितले की, प्लॅस्टिक सर्जरीनंतर मी माझ्या शरीराकडे बघून खूपच दु:खी होत आहे. जर मला प्लॅस्टिक सर्जरीच्या दुष्परिणामाची अगोदरच कल्पना दिली असती तर मी हा खटाटोप केलाच नसता. 

मिरर डॉट कॉम डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार डेनियलने ‘क्लोजर’ या साप्ताहिकाशी बोलताना याविषयी वाच्यता केली. ती म्हणाली की, जर मी माझ्या शरीराशी छेडछाड केली नसती तर खूप चांगले झाले असते. आता मी खूपच निराश झाले असून, मला पश्चात्ताप होत आहे. प्लॅस्टिक सर्जरीचा निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वाच मोठा चुकीचा निर्णय ठरला. मात्र प्लॅस्टिक सर्जरीच्या दुष्परिणामाची मला कोणीही माहिती दिली नसल्याचेही वाईट वाटत आहे. 

जेव्हा डेनियलने प्लॅस्टिक सर्जरी केली होती, तेव्हा तिचे वय २० वर्ष इतके होते. डेनियलने २००४ मध्ये मिस इंग्लंडचा किताब जिंकला होता. २०१२ मध्ये तिच्या ब्रेस्ट इंप्लांट्सपैकी एक फुटला होता. त्यामुळे ती खूपच हताश झाली होती. जेव्हा सर्जनकडून तिची तपासणी करण्यात आली तेव्हा तिच्या पेशींमध्ये रक्त गोठल्याचे निदान झाले होते. त्यामुळेच तिला सर्जरीसारखा निर्णय घ्यावा लागला.

Web Title: Repentance of plastic surgery due to Daniel Loyat