'तुझ्यासारखं या जगात दुसरं कोणीही नाही', देसी गर्ल प्रियंका चोप्राची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:47 AM2024-05-10T09:47:05+5:302024-05-10T09:50:39+5:30

प्रियंकाचा पती पॉपस्टार निक जोनस हा गायक आणि अभिनेता देखील आहे.

Priyanka Chopra shares 'husband appreciation post' for Nick Jonas starting new film | 'तुझ्यासारखं या जगात दुसरं कोणीही नाही', देसी गर्ल प्रियंका चोप्राची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली…

'तुझ्यासारखं या जगात दुसरं कोणीही नाही', देसी गर्ल प्रियंका चोप्राची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली…

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)  आणि अमेरिकी सिंगर निक जोनस (Nick Jonas)  यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. प्रियंकाचा पती पॉपस्टार निक जोनस हा गायक आणि अभिनेता देखील आहे. तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे.  आता निकने त्याच्या आगामी 'पॉवर बल्लाड' या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. 

निक जोनासला काही काळापूर्वी इन्फ्लूएंझा ए झाला होता. आजारपणामुळे त्याला कॉन्सर्टही रद्द करावे लागले होते. एक व्हिडीओ शेअर करत त्याने चाहत्यांची माफी मागितली होती. आता पाच दिवसांनंतर निक चित्रपटाच्या सेटवर परतला आहे. निकने इंस्टाग्राम स्टोरीवर शूटशी संबंधित माहिती शेअर केली आहे. "कामावर परत आल्याचा आनंद झालाय. पॉवर बॅलडच्या सेटवर आज पहिला दिवस. चला तर काम करूया", असं त्यानं लिहलं. यासोबतच 'पॉवर बॅलड'ची कथा जॉन कार्नी आणि पीटर मॅकडोनाल्ड यांनी लिहिल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रियंका आणि निक कायम एकमेंकाना पाठिंबा देताना पाहायला मिळतात. निक जोनास कामावर परतल्याने प्रियांका चोप्रा देखील खूप आनंदी झाली आहे. तिने थेट पतीसाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने 'पॉवर बॅलड'मधील निकचा लूक तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला. या पोस्टमध्ये प्रियंकाने निकचे कौतुक केले असून त्याला शुटिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

 प्रियंकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "पतीसाठी कौतुकाची पोस्ट...जसं मी एक काम संपवते, त्याच एक सुरु होतं. ब्रह्मांड आम्हाला जोडून ठेवत आहे. पॉवर बॅलडचे शूटिंग सुरू झाल्याचा आनंद आहे. शुटिंगच्या पहिल्या दिवसासाठी खूप शुभेच्छा. एवढी मेहनत करणारा तुझ्यासारखा या जगात दुसरा कोणीही नाही नाही. हे खूप सुंदर होणार आहे". प्रियंकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.   प्रियंकाने नुकतेच तिच्या आगामी 'हेड ऑफ स्टेट' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. ती शेवटची वेब सीरिज 'सिटाडेल'मध्ये दिसली होती. 
 

Web Title: Priyanka Chopra shares 'husband appreciation post' for Nick Jonas starting new film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.