प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेज अडकली विवाहबंधनात, सोशल मीडियावर शेअर केले खास क्षण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:33 IST2025-09-28T13:31:30+5:302025-09-28T13:33:06+5:30
वयाच्या ३३ व्या वर्षी प्रसिद्ध गायिकेने बांधली लग्नगाठ! सोशल मीडियाद्वारे दिली खुशखबर

प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेज अडकली विवाहबंधनात, सोशल मीडियावर शेअर केले खास क्षण!
Selena Gomez: प्रसिद्ध पॉप सिंगर आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारी सेलेना गोमेझ लग्नबंधनात अडकली आहे. काल २७ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियात बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोसोबत विवाहबंधनात अडकली.नुकतेच तिने सोशल मीडियावर तिच्या लग्न समारंभातील खास फोटो शेअर केले आहेत. या स्वप्नवत समारंभातील सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर करत गायिकेने चाहत्यांना लग्नाची झलक दाखवली आहे.
सेलेना गोमेज 'काम डाऊन', 'पिपल यू नो', 'व्हू सेस','लव्ह ऑन', 'सिंगल सून', 'बॅक टू यू' अशा सुपरहिट गाण्यांसाठी ओळखली जाते. गतवर्षी सेलेनाने बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोसोबत गुपचूप साखरपुडा उरकला होता. त्यानंतर आता ती लग्नबंधनात अडकली आहे. सोशल मीडियावरील तिची पोस्ट पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. लग्नासाठी सेलेनाने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तर तिचा पती बेनी ब्लँकोने काळ्या रंगाचा सूट घातला आहे. तसेच तिने पतीबरोबर रोमॅन्टिक पोजही दिल्या आहेत. सेलेना गोमेजने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे हे फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टला कॅप्शन म्हणून तिने लग्नाची तारीख मेंन्शन केल्याचं पाहायला मिळतंय. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो चर्चेत आहेत.
कोण आहे सेलेनाचा पती?
सेलेना गोमेजचा पती बेनी ब्लँको हा उत्तम गीतकार असून त्याने आजवर अनेक गाण्यांचं रेकॉर्डिंग केलं आहे. मिडिया रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर कामानिमित्त भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांच्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं आणि याचं मैत्रीचं कालांतराने प्रेमात रुपांतर झालं.