Oscar Awards 2026: 'अवतार : फायर अँड अ‍ॅश' सिनेमाने पटकावला ऑस्कर, कोणत्या कॅटेगरीत मिळाला पुरस्कार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 09:37 IST2026-03-16T09:37:05+5:302026-03-16T09:37:34+5:30

हॉलिवूडच्या भारतात गाजलेल्या 'अवतार : फायर अँड अॅश' या सिनेमाला ९८व्या अकादमी पुरस्कार मिळाला आहे. 'अवतार : फायर अँड अॅश' सिनेमाला बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट या कॅटेगरीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

Oscar Awards 2026 'Avatar: Fire and Ash' wins best visual effect in 98th academy award | Oscar Awards 2026: 'अवतार : फायर अँड अ‍ॅश' सिनेमाने पटकावला ऑस्कर, कोणत्या कॅटेगरीत मिळाला पुरस्कार?

Oscar Awards 2026: 'अवतार : फायर अँड अ‍ॅश' सिनेमाने पटकावला ऑस्कर, कोणत्या कॅटेगरीत मिळाला पुरस्कार?

Oscars Awards 2026: मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठित आणि मानाचा मानला जाणारा ९८वा अकादमी पुरस्कार सोहळा आज अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रेझेंटर म्हणून झळकली. प्रियांकाने पती निक जोनाससह ९८व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. 

हॉलिवूडच्या भारतात गाजलेल्या 'अवतार : फायर अँड अॅश' या सिनेमाला ९८व्या अकादमी पुरस्कार मिळाला आहे. 'अवतार : फायर अँड अॅश' सिनेमाला बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट या कॅटेगरीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे याआधी  २०२३ मध्ये 'अवतार : वे ऑफ वॉटर' आणि २०१० साली 'अवतार' या सिनेमाला ऑस्करचा बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे अवतारने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे. 

९८व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मायकल बी जॉर्डन याला प्रदान करण्यात आला. सिनर्स सिनेमासाठी अभिनेत्याला हा पुरस्कार मिळाला. तर यंदाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारावर अभिनेत्री जेसी बॅकली हिने नाव कोरलं. हॅमनेट या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. 'वन बॅटल आफ्टर अनदर' हा चित्रपट यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. या सिनेमाने तब्बल ६ ऑस्कर नावावर केले आहेत. 

दरम्यान, 'अवतार : फायर अँड अॅश' हा सिनेमा गेल्या वर्षी प्रदर्शित झाला आहे. अवतार या फ्रँचायजीचा हा तिसरा भाग आहे. २००९ मध्ये अवतार प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर २०२२ मध्ये अवतारचा सीक्वल 'अवतार : वे ऑफ वॉटर' रिलीज करण्यात आला. जेम्स कॅमेरून यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटांची जगभर क्रेझ आहे.  

Web Title : 'अवतार: फायर एंड ऐश' ने जीता ऑस्कर 2026: श्रेणी विवरण

Web Summary : 98वें अकादमी पुरस्कारों में, 'अवतार: फायर एंड ऐश' ने सर्वश्रेष्ठ दृश्य प्रभावों का पुरस्कार जीता। माइकल बी. जॉर्डन और जेसी बकली ने अभिनय पुरस्कार जीते। 'वन बैटल आफ्टर अनदर' ने छह ऑस्कर के साथ सर्वश्रेष्ठ फिल्म का पुरस्कार जीता। यह तीसरी 'अवतार' फिल्म है।

Web Title : 'Avatar: Fire and Ash' Wins Oscar 2026: Category Details

Web Summary : At the 98th Academy Awards, 'Avatar: Fire and Ash' won Best Visual Effects. Michael B. Jordan and Jessie Buckley won acting awards. 'One Battle After Another' won Best Picture with six Oscars. This is the third 'Avatar' film.

टॅग्स :Oscarऑस्कर