वन लास्ट टाइम! 'मिशन इम्पॉसिबल'च्या शेवटच्या भागाबद्दल टॉम क्रूझ उत्सुक, म्हणाला- "आजवर जे काही केलं ते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 16:32 IST2025-05-08T16:30:42+5:302025-05-08T16:32:43+5:30

'मिशन इम्पॉसिबल' या गाजलेल्या सीरिजचा शेवटचा भाग लवकरच रिलीज होणार आहे. यानिमित्त टॉम क्रूझने त्याच्या मनातील भावना शेअर केल्या.

One Last Time Tom Cruise excited about the final part of Mission Impossible The Final Reckoning | वन लास्ट टाइम! 'मिशन इम्पॉसिबल'च्या शेवटच्या भागाबद्दल टॉम क्रूझ उत्सुक, म्हणाला- "आजवर जे काही केलं ते..."

वन लास्ट टाइम! 'मिशन इम्पॉसिबल'च्या शेवटच्या भागाबद्दल टॉम क्रूझ उत्सुक, म्हणाला- "आजवर जे काही केलं ते..."

जवळपास तीन दशकं  Mission: Impossible या मालिकेची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे.  'मिशन इम्पॉसिबल'च्या सर्वच भागांनी अ‍ॅक्शन सिनेमाचे मोजमापच बदलून टाकले आहे. या सिनेमांच्या केंद्रस्थानी आहे एक असा माणूस जो असंभव वाटणाऱ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत लढतो. हा माणूस दुसरा तिसरा कोणी असून तो आहे 'मिशन इम्पॉसिबल'चा नायक टॉम क्रूज. 'मिशन इम्पॉसिबल'चा शेवटचा भाग अर्थात Mission Impossible – The Final Reckoning लवकरच रिलीज होणार आहे. त्यानिमित्त टॉम काय म्हणाला, जाणून घ्या. 

टॉम क्रूझ  'मिशन इम्पॉसिबल'विषयी काय म्हणाला

सुपरस्पाय ‘इथन हंट’च्या भूमिकेत झळकणारा टॉम क्रूज कधी मोठ्या दगडांवरुन बाईक चालवतो तर कधी गगनचुंबी इमारतींवर चढतो, विमानांतून उड्या मारतो. अ‍ॅक्शन  सिनेमाची आता ही गाथा आपल्या शेवटाकडे वाटचाल करत आहे Mission: Impossible – The Final Reckoning या चित्रपटासह. यानिमित्त टॉमने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

टॉम क्रूज म्हणतो की, “ Mission: Impossible सिनेमाच्या सेटवर एकही दिवस सोपा नसतो. आणि मला तेच हवं असतं. ही नवीन फिल्म आमच्यासाठी एक प्रचंड मोठी आणि यशस्वी वाटचाल आहे. हे सर्व आम्ही याआधी केलेल्या गोष्टींचं परिपूर्ण रूप आहे. मी खरंच म्हणतो, मी आणि मॅक्यू (क्रिस्टोफर मॅकक्वेरी, मागील चार भागांचे दिग्दर्शक) आम्ही खूप काही या प्रवासात शिकलो आहोत. The Final Reckoning हा सिनेमा खूपच मोहक, गुंतागुंतीचा आणि भव्य असणार आहे. आम्ही आजवर जे काही साध्य केलं, ते सगळं या सिनेमांतील मागच्या अनुभवांमुळे शक्य झालं.”

सिनेमाचे दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅकक्वेरी पुढे म्हणतात, “आम्ही सिनेमॅटिक प्रयत्नांचा नेहमी पाठलाग करत आलोय. टॉम नेहमी बस्टर कीटनकडे पाहतो, पण त्याचबरोबर डग्लस फेअरबँक्स आणि चार्ली चॅप्लिनकडेही तो आदराने बघतो. हे असे कलाकार होते ज्यांनी अ‍ॅक्शन चित्रपटांना नाटक, विनोद, शोकांतिका यांचा तडका दिला. ज्यांच्यामुळे आधुनिक सिनेमाची पायाभरणी झाली.”

कधी रिलीज होणार Mission: Impossible – The Final Reckoning

The Final Reckoning मध्ये इथन हंटला आजवरच्या सर्वात धोकादायक, अत्यंत वैयक्तिक आणि कथानकाच्या दृष्टीने सर्वात गुंतागुंतीच्या मिशनला सामोरं जावं लागतं. एक असं मिशन जे केवळ जागतिक सुरक्षेला नाही, तर त्याच्या स्वतःच्या अस्तित्वालाही मुळांपर्यंत हादरवून टाकेल.  Mission: Impossible – The Final Reckoning भारतभर १७ मे २०२५ रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये  प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: One Last Time Tom Cruise excited about the final part of Mission Impossible The Final Reckoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.