Video: मिस युनिव्हर्स स्पर्धेत रॅम्प वॉक करत होती मॉडेल, अचानक तोल गेला अन् स्टेजवरुन खाली पडली, चाहत्यांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 11:21 IST2025-11-21T11:20:28+5:302025-11-21T11:21:55+5:30
जमैका देशाची सुंदरी मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी झाली होती. आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करताना तिचा तोल गेला अन्...

Video: मिस युनिव्हर्स स्पर्धेत रॅम्प वॉक करत होती मॉडेल, अचानक तोल गेला अन् स्टेजवरुन खाली पडली, चाहत्यांना धक्का
'मिस युनिव्हर्स' या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची खूप चर्चा आहे. या स्पर्धेत फातिमा बॉशने मिस युनिव्हर्सचं विजेतेपद पटकावलं. गेल्या अनेक दिवसांपासून 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेसंबंधी विविध व्हिडीओ आणि बातम्या समोर येत होत्या. अशातच या स्पर्धेसंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जमैका देशाची सुंदरी 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत रॅम्प वॉक करताना अचानक कोसळली. लाईव्ह टेलिव्हिजनवर ही घटना कैद झाल्याने सर्वांना धक्का बसला.
रॅम्प वॉक करताना तोल गेला आणि...
बुधवारी थायलंड येथील एका आलिशान सभागृहात 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतील इवनिंग गाऊन सेगमेंटसाठी गाब्रिएल हेनरी सहभागी झाली होती. यावेळी चमकणारा ऑरेंज गाऊन परिधान करत अत्यंत आत्मविश्वासाने गाब्रिएल रॅम्प वॉक करत होती. सर्व काही सुरळित सुरु होतं. गाब्रिएलने सर्वांना अभिवादन केलं. अशातच रॅम्प वॉक करुन मागे फिरताना गाब्रिएलचा स्टेजच्या एका बाजूला अचानक तोल गेला आणि ती जोरात खाली पडली. त्यानंतर स्टाफने तत्परता दाखवत गाब्रिएलला सुरक्षित पद्धतीने बाहेर घेऊन गेले.
द न्यूज इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार, मेडिकल टीम गाब्रिएलला स्ट्रेचरवरुन प्रथमोपचार केंद्रात घेऊन गेले. त्यानंतर पुढील तपासणीसाठी तिला पाओलो रंगसिट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, तिची प्रकृती आता स्थिर आहे. याशिवाय सुदैवाने तिला कोणतंही फ्रॅक्टर किंवा गंभीर जखम झाली नाहीये. सध्या तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. गाब्रिएल हेनरी लवकरात लवकर बरी होईल, अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे.