माइक कॉमरीवर बलात्काराचा आरोप; जमिनीवर पाडून केला बळजबरीने सेक्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 21:32 IST2017-02-16T16:02:46+5:302017-02-16T21:32:46+5:30

हॉलिवूड अभिनेत्री हिलेरी डफ हिचा पहिला पती माइक कॉमरी याला लॉस एंजेलिसच्या पोलिसांनी बलात्कार प्रकरणी ताब्यात घेतले आहे. हॉकी ...

Mike Comrade accused of rape; Casting on the ground forced sex? | माइक कॉमरीवर बलात्काराचा आरोप; जमिनीवर पाडून केला बळजबरीने सेक्स?

माइक कॉमरीवर बलात्काराचा आरोप; जमिनीवर पाडून केला बळजबरीने सेक्स?

लिवूड अभिनेत्री हिलेरी डफ हिचा पहिला पती माइक कॉमरी याला लॉस एंजेलिसच्या पोलिसांनी बलात्कार प्रकरणी ताब्यात घेतले आहे. हॉकी खेळाडू असलेल्या माइक कॉमरी याच्यावर लावण्यात आलेल्या या आरोपामुळे त्याच्या फॅन्सला चांगलाच धक्का बसला आहे. 

टीएमजेड डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलेने माइक कॉमरी याच्यावर आरोप केले तिने सांगितले की, माइक कॉमरी याने माझ्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्याने माझ्या शरीराच्या विविध भागांना हात लावला. तसेच मला जमिनीवर पाडून सेक्स करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला विरोध केला, परंतु त्याने बळजबरीने माझ्याशी सेक्स केल्याचे म्हटले आहे. मात्र कॉमरीने या महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावत, आमच्यात जे काही झाले ते दोघांच्याही सहमतीने झाल्याचे म्हटले आहे. 



लॉस एंजेलिसच्या पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी लिलियाना प्रेसियाडो यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, कॉमरीची सखोल चौकशी केली जात असल्याचे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार गेल्या शनिवारी घडला आहे. कारण याच दिवशी कॉमरी आणि त्या महिलेची भेट झाली होती. त्यानंतर ते दोघेही वेस्ट हॉलिवूड येथील एका अपार्टमेंटमध्ये गेले होते. ज्याठिकाणी दोघांनी एकापेक्षा अधिक वेळा सेक्स केला आहे. मात्र दोघांमधील हे लैंगिक संबंध त्या महिलेच्या इच्छेविरोधात केले गेले. अर्थात हा दावा त्या महिलेनेच केला आहे. 

मात्र कॉमरीने या संपूर्ण प्रकरणावर त्याच्याकडून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचे अधिकृत स्टेटमेंट दिलेले नाही. परंतु पोलिसांच्या रिपोर्टनुसार कॉमेरी संबंधित महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांच्या रिपोर्टनुसार या संपूर्ण प्रकरणात या दोघांसह आणखी एका महिलेचा समावेश असून, त्या महिलेने अद्यापपर्यंत याविषयीची तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नवे ट्विस्ट निर्माण झाले आहेत. 

Web Title: Mike Comrade accused of rape; Casting on the ground forced sex?