‘सेक्स’साठी मायकल बबल बनला सिंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 13:36 IST2016-10-23T13:36:20+5:302016-10-23T13:36:55+5:30
एखादा व्यक्ती कलाकार का बनते याची अनेक कारणे असू शकतात. परंतु मायकल बबल गायक का झाला याचे फार रंजक ...

‘सेक्स’साठी मायकल बबल बनला सिंगर
ए ादा व्यक्ती कलाकार का बनते याची अनेक कारणे असू शकतात. परंतु मायकल बबल गायक का झाला याचे फार रंजक कारण आहे. तो सांगतो की, मुलींना इम्प्रेस करण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी मी गायक होण्याचा निर्णय घेतला.
‘द क्राय मी अ रिव्हर’ सिंगर मायकलचा हा खुलासा अनेक नव गायकांसाठी योग्य प्रेरणा ठरेल की नाही हा वादाचा मुद्दा आहे; पण त्याने दिलेली ही प्रांजळ कबुली आहे. त्याच्या मते, मुलं तरुणपणी क्षेत्र निवडताना पैशांबरोबरच अधिकाधिक मुलींना कसं आकर्षित करता येईल याचा विचार करत असतात.
संगीतक्षेत्र तर प्रसिद्धी मिळवण्यासाठी खूप पोषक आहे. कॉलेजमध्ये ‘म्युझिक टॅलेंट’ असणाऱ्या मुलांना खूप भाव मिळतो. त्यानुसार मायकलने मग म्युझिकमध्ये रस घेण्यास सुरूवात केली. केवळ तेराव्या वर्षीच त्याला हा साक्षात्कार झाला होता की, लोकप्रिय झाले तर मुलीं स्वत: पुढाकार घेऊन तुमच्याशी मैत्री करतात.
परफेक्ट फमिली : मायकल, नोह, एलियास आणि लुईसाना
४१ वर्षीय मायकलची पत्नी लुईसाना लोपिलाटो असून त्यांना नोहा (३) आणि एलियास (८ महिने) अशी दोन मुले आहेत. अलिकडे एका मुलाखतीमध्ये त्याने आणखी मुलं पाहिजे असल्याचे सांगितले होते. परंतु तो निर्णय सर्वस्वी त्याच्या पत्नीचा असेल, हे सांगायला तो विसरला नाही.