केंडल जेनर अन् रॅपर रॉकी यांचा पुन्हा बघण्यात आला रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 21:52 IST2017-01-19T21:52:18+5:302017-01-19T21:52:18+5:30

मॉडल केंडल जेनर आणि रॅपर ए. रॉकी यांच्या डेटिंगच्या चर्चा पुन्हा एकदा व्हायरल झाल्या आहेत. कारण दोघेही केंडलची बहीण ...

Kendall Jenner and Rapper Rocky were seen again | केंडल जेनर अन् रॅपर रॉकी यांचा पुन्हा बघण्यात आला रोमान्स

केंडल जेनर अन् रॅपर रॉकी यांचा पुन्हा बघण्यात आला रोमान्स

डल केंडल जेनर आणि रॅपर ए. रॉकी यांच्या डेटिंगच्या चर्चा पुन्हा एकदा व्हायरल झाल्या आहेत. कारण दोघेही केंडलची बहीण काइली जेनर आणि तिचा बॉयफ्रेंड रॅपर टीगा यांच्यासोबत शॉपिंग अन् रोमान्स करताना बघावयास मिळाले.

kendall jenner and rapper a rocky romance

एसशोबीज डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच केंडल आणि रॉकी एकत्र फोटो काढण्याचा आनंद घेताना बघावयास मिळाले. दोघेही एवढे आनंदी होते की, त्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध असावेत असे स्पष्टपणे बघावयास मिळत होते. शिवाय दोघेही एकमेकांच्या शॉपिंगच्या पिशव्या घेऊन बाहेर पडले. 

केंडलने हातमोजे खरेदी केले असल्याचे प्रत्यक्षदर्शीने बघितले होते. जेव्हा हे दोघे बाहेर येत होते तेव्हाच कायली आणि तिचा बॉयफ्रेंड टीगा त्यांच्याजवळ आलेत. यावेळी कायलीने काळ्या रंगाचा ट्रॅक सूट परिधान केला होता, तर टीगा काळ्या रंगाच्याच जिम पोशाखमध्ये बघावयास मिळाला. 

kendall jenner and rapper a rocky romance

केंडल आणि रॉकी मार्च २०१६ मध्ये एकत्र बघावयास मिळाले होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची अफवा पसरली होती. दोघांचे एकत्र फोटोही त्यावेळी शेअर केले गेले. त्यानंतर मात्र दोघे कधीच एकत्र बघण्यात आले नव्हते. आता पुन्हा एकदा ते एकत्र दिसल्याने त्यांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही एकमेकांना डेट करीत आहेत. मात्र त्यांच्यातील नाते उघडपणे सांगण्यास ते पुढे येत नसल्यानेच त्यांच्याविषयीच्या चर्चा सध्या रंगत आहेत. नुकतेच दोघांनी मालिबू येथे एकत्र डिनर केले होते. त्याचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यांच्या अफेअरविषयी जाणून घेण्यास त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत. आता या नात्याचा उलगडा कोण करणार हे बघणे मात्र मजेशीर ठरेल.

Web Title: Kendall Jenner and Rapper Rocky were seen again