केटी प्राइसने सिमॉन कॉवेलसोबत घालविली रात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 22:05 IST2017-02-09T16:35:06+5:302017-02-09T22:05:06+5:30

प्रसिद्ध टीव्हीस्टार केटी प्राइस हिने संगीताचा बादशाह सिमॉन कॉवेल याच्याबरोबर रात्र घालविल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम दिला आहे. तिने कॉवेलसोबत ...

Katie Price spent the night with Simon Cowell | केटी प्राइसने सिमॉन कॉवेलसोबत घालविली रात्र

केटी प्राइसने सिमॉन कॉवेलसोबत घालविली रात्र

रसिद्ध टीव्हीस्टार केटी प्राइस हिने संगीताचा बादशाह सिमॉन कॉवेल याच्याबरोबर रात्र घालविल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम दिला आहे. तिने कॉवेलसोबत रात्र घालविल्याची कबुली दिली असून, मात्र यादरम्यान त्याच्यासोबत संबंध ठेवले नसल्याचा खुलासा केला आहे. केटीच्या या खुलाशामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

‘एक्स फॅक्टर’चा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या कॉवेलने यापूर्वी केटीसोबतच्या संबंधाबाबतच्या चर्चेला अफवा म्हणून संबोधले होते. केटी प्राइसचा पहिला बॉयफ्रेंड लियेन्ड्रो पेना याने दावा केला होता की, कॉवेलमुळेच त्याचे केटीसोबतचे संबंध बिघडले आहेत. लियेन्ड्रोच्या या दाव्यामुळे कॉवेल अन् केटीच्या संबंधांवरून जोरदार चर्चाही रंगली होती. परंतु कॉवेलने या चर्चा निराधार असल्याचे म्हटले होते. अखेर केटीने याविषयीचा खुलासा केल्याने कॉवेलची आता पंचाईत झाली आहे. 



पार्टीत एकत्र आलेले केटी प्राइस आणि सिमॉन कॉवेल
गेल्या रविवारी ‘द सन’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, प्राइसने सांगितले की, एका अवॉर्ड पार्टीनंतर ती कॉवेलच्या घरी गेली होती. रात्रभर त्याच्यासोबत राहिली. मात्र यादरम्यान आमच्यात कुठल्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित झाले नव्हते. केटीचा हा खुलासा खळबळजनक असला तरी, दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले नसल्याच्या चर्चेला बळकटी देणारा असल्याचे बोलले जात आहे. मात्र तिचा पहिला बॉयफ्रेंड अद्यापही केटीच्या या खुलाशावर विश्वास ठेवण्यास तयार नाही. 

मिरर डॉट को डॉट यूकेने दिलेल्या माहितीनुसार लियेन्ड्रो पेनाने गेल्या आठवड्यातच सांगितले होते की, कॉवेलबरोबरच्या व्यावसायिक भेटीनंतर जेव्हा केटी सकाळी नशेमध्ये घरी पोहचली तेव्हाच मला संशय आला होता. तेव्हापासून दोघांमध्ये शारीरिक संबंध झाल्याचे मी वारंवार सांगत आलो आहे. केटीने केलेल्या खुलाशात फारसे तथ्य नसून, ती दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचेही त्याने म्हटले आहे. आता त्या रात्री दोघांमध्ये नेमके काय घडले हे रहस्य तर राहणार नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

Web Title: Katie Price spent the night with Simon Cowell