एकटेपणा घालविण्यासाठी जायन मलिकला हवी गर्लफ्रेंड गीगी हदीदची साथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 22:41 IST2017-03-16T17:11:09+5:302017-03-16T22:41:53+5:30

वन डायरेक्शनचा गायक जायन मलिक सध्या गर्लफ्रेंड मॉडल गीगी हदीद हिच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. त्यामुळेच त्याच्या तिच्याकडून अपेक्षा ...

Jeyan Malik wants to get lonely girlfriend Gigi Hadidchi together! | एकटेपणा घालविण्यासाठी जायन मलिकला हवी गर्लफ्रेंड गीगी हदीदची साथ!

एकटेपणा घालविण्यासाठी जायन मलिकला हवी गर्लफ्रेंड गीगी हदीदची साथ!

डायरेक्शनचा गायक जायन मलिक सध्या गर्लफ्रेंड मॉडल गीगी हदीद हिच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. त्यामुळेच त्याच्या तिच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. नुकतेच त्याने म्हटले की, जेव्हा मी एकटा असतो, तेव्हा मला गीगी हदीद हिची साथ हवी असते. 

डेलीमेल डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, लिटिल मिक्स गायिका पेरी एडवडर््स हिच्याशी डेटिंग केलेला गायक जायन मलिक सध्या गीगी हदीदने गायिलेल्या नव्या व्हिडीओमध्ये काम करताना बघावयास मिळत आहे. या व्हिडीओमध्ये गीगी हदीद कॅमेºयासमोर जायन मलिकसोबत बोलताना दिसत आहे. 



ती त्याला म्हणतेय की, ‘जेव्हा तू एकटा असशील तेव्हा तुला कोणाची संगत हवी?’ गीगीच्या या प्रश्नावर जायन मलिक म्हणतोय की, ‘तुझी साथ हवी’ हदीददेखील त्याला, ‘थॅँक्यू बेबी’ असे म्हणत त्याच्या उत्तराला एकप्रकारचा दुजोरा देते. सध्या जायन मलिक आणि गीगी हदीद यांची प्रेमकहाणी चांगलीच बहरत असून, या व्हिडीओमुळे त्यांच्यातील संबंध किती घट्ट आहेत, हेच स्पष्ट होते. 

दरम्यान, हा व्हिडीओ त्यांच्या फॅन्सकडून पसंत केला जात असून, सोशल मीडियावर तो प्रचंड प्रमाणात बघितला जात आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याचे दाखवत असलेले हे हे जोडपे किती काळ एकत्र राहणार हे बघणे मजेशीर ठरणार आहे. 

Web Title: Jeyan Malik wants to get lonely girlfriend Gigi Hadidchi together!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.