'ही' प्रसिद्ध गायिका झाली इशा अंबानी-आनंद यांच्या घराची मालकीन; 500 कोटींचा केला करार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 03:34 PM2024-04-03T15:34:26+5:302024-04-03T15:36:26+5:30

Isha ambani: ईशाने तिचं लॉस एंजलीसमधील आलिशान घर नुकतंच विकलं आहे.

isha-ambani-sold-her-bungalow-for-500-crores-this-celebrity-couples-bought-it | 'ही' प्रसिद्ध गायिका झाली इशा अंबानी-आनंद यांच्या घराची मालकीन; 500 कोटींचा केला करार

'ही' प्रसिद्ध गायिका झाली इशा अंबानी-आनंद यांच्या घराची मालकीन; 500 कोटींचा केला करार

अंबानी कुटुंबाची लाडकी लेक ईशा अंबानी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कधी तिच्या लक्झरी लाइफस्टाइलमुळे तर कधी तिच्या साधेपणामुळे ती कायम चाहत्यांचं मन जिंकत असते. मात्र, यावेळी ईशा तिच्या घरामुळे चर्चेत येत आहे. ईशा आणि आनंद पिरामल यांचं लॉस एंजेलिसमधील घर एका प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याने खरेदी केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ईशा आणि आनंद यांनी त्यांचं अमेरिकेतील बंगला प्रसिद्ध हॉलिवूड गायिका जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांना विकलं आहे. विशेष म्हणजे या घराच्या विक्रीचा करार प्रचंड मोठ्या किंमतीला झाला आहे.

'हिंदुस्थान टाइम्स'च्या वृत्तानुसार,जेनिफर आणि बेन यांनी जून महिन्यामध्ये हा आलिशान बंगला खरेदी केला आहे. या घरासाठी त्यांनी तब्बल ५०० कोटी रुपये मोजले आहेत. लॉस एंजेलिसच्या बेव्हरली हिल्सच्या मध्यभागी हा बंगला असून ३८ हजार स्क्वेअर फूटच्या विस्तीर्ण भागात तो उभारला आहे. या घरात १२ बेडरुम, २४ बाथरुम, एक इनडोअर पिकलबॉल कोर्ट, जिम, सॅलोन, स्पा, १५५ फूट लांबीचा इनफिनिटी स्विमिंग पूल, स्वयंपाकघर आणि गार्डन अशा सुखसुविधा आहेत.

दरम्यान, ईशा प्रेग्नंसी काळात LA Mansion  या बंगल्यात वास्तव्यास होती. तोच बंगला आता तिने विकला आहे. विशेष म्हणजे २०२३ मध्ये तिने हे घर प्रियांका चोप्राला एका स्पेशल स्क्रिनिंगसाठीही दिलं होतं. 

Web Title: isha-ambani-sold-her-bungalow-for-500-crores-this-celebrity-couples-bought-it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.