पहिलं लग्न टिकलं नाही, आता दुसरंही मोडलं; लग्नाच्या १९ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, पदरात दोन मुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:33 IST2025-09-30T13:33:03+5:302025-09-30T13:33:34+5:30
निकोल पती किथ अर्बनसोबत घटस्फोट घेत वेगळी झाली आहे. त्यांचा १९ वर्षांचा संसार मोडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. अखेर यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

पहिलं लग्न टिकलं नाही, आता दुसरंही मोडलं; लग्नाच्या १९ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, पदरात दोन मुली
सिनेइंडस्ट्रीत अजून एक घटस्फोट झाला आहे. हॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती निकोल किडमैन तिच्या पर्सनल लाइफमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निकोल पती किथ अर्बनसोबत घटस्फोट घेत वेगळी झाली आहे. त्यांचा १९ वर्षांचा संसार मोडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. अखेर यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या कठीण काळात निकोलच्या बहिणीने तिला आधार दिला. निकोलला घटस्फोट घ्यायचा नव्हता. तिने तिचा संसार वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं जवळच्या सूत्रांनी सांगितलं. ५८ वर्षीय निकोलने एक वर्षांनी लहान असलेल्या कीथसोबत २००६मध्ये लग्न केलं होतं. त्याआधी एक वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. त्यांना १७ वर्षांची संडे रोज आणि १४ वर्षांची फेथ मार्गरेट या दोन मुली आहेत.
निकोलने १९९० साली टॉम क्रूझसोबत लग्न केलं होतं. मात्र ११ वर्षांनी ते वेगळे झाले. त्यांनी दोन मुलं दत्तक घेतली होती. टॉम क्रूझसोबत घटस्फोट झाल्यानंतर निकोलने किथ अर्बनसोबत संसार थाटला होता. पण, आता तिचं दुसरं लग्नही मोडलं आहे.