साखरपुड्याची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्याचं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप, दोघांच्या वयात २६ वर्षांचं अंतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:16 IST2025-10-17T16:07:43+5:302025-10-17T16:16:51+5:30
लवकरच साखरपुडा करणार अशी चर्चा असतानाच प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे

साखरपुड्याची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्याचं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप, दोघांच्या वयात २६ वर्षांचं अंतर
मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार होता. इतकंच नव्हे दोघांच्या साखरपुड्याचीही चर्चा होती. परंतु याच चर्चांदरम्यान अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतलाय. हा अभिनेता आहे हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझ. ६३ वर्षीय अभिनेता टॉम क्रूझ आणि ३७ वर्षीय अभिनेत्री ॲना डी आर्मास यांचं ब्रेकअप झालं आहे. काय आहे यामागील कारण?
टॉम क्रूझच्या ब्रेकअपचं कारण काय?
टॉम आणि ॲना या दोघांचं नातं ९ महिन्यांचं संपुष्टात आलं आहे. दोघांच्या वयातील तब्बल २६ वर्षांचं अंतर त्यांच्या ब्रेकअपचं कारण ठरलं असल्याची चर्चा आहे. टॉम क्रूझ आणि ॲना डी आर्मास या दोघांनी त्यांचं नातं अत्यंत खाजगी ठेवलं होतं. मागील ९ महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत होते. मात्र दोघांचं व्यस्त वेळापत्रक आणि भविष्याबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनातील फरक यामुळे त्यांचं नातं टिकू शकलं नाही, असं त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं आहे.
Tom Cruise and Ana de Armas have parted ways after recognizing that their romantic connection had faded. pic.twitter.com/p511AtIGQs
— People Of The Internet (@PeopleOfTheInt) October 17, 2025
टॉम क्रूझ नेहमीच आपल्या कामामुळे चर्चेत असतो, तर ॲना डी आर्मासने देखील तिच्या अभिनयाने हॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दोघांच्या चाहत्यांसाठी ही बातमी धक्कादायक आहे, कारण अनेक इव्हेंट्समध्ये त्यांची उत्कृष्ट केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. इतकंच नव्हे दोघांनी थेट अंतराळात लग्न करण्याचं स्वप्न बघितलं होतं.
टॉम क्रूझ आणि ॲना डी आर्मास यांच्या वयात जवळपास २६ वर्षांचं अंतर आहे. टॉम क्रूझ ६३ वर्षांचा आहे, तर ॲना ३७ वर्षांची आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टॉम क्रूझला आयुष्यात सध्या शांतता हवी आहे, तर ॲनाला अजून तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. वयामुळे त्यांच्या अपेक्षा आणि गरजा वेगवेगळ्या होत्या, ज्यामुळे अखेर दोघांनी सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. टॉम क्रूझने यापूर्वी अभिनेत्री निकोल किडमन आणि केटी होम्स यांच्याशी विवाह केला होता.