हॅन्नाह फॉलर, सॅम हंट यांचा साखरपुडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 22:03 IST2017-01-05T22:03:32+5:302017-01-05T22:03:32+5:30

गेल्या काही महिन्यांपासून नेहमीच चर्चेत राहणारं जोडपं सॅम हंट आणि त्याची गर्लफ्रेंड हॅन्नाह ली फॉलर यांनी नुकताच साखरपुडा केला ...

Hannaah Faller, Sam Hunt? | हॅन्नाह फॉलर, सॅम हंट यांचा साखरपुडा?

हॅन्नाह फॉलर, सॅम हंट यांचा साखरपुडा?

ल्या काही महिन्यांपासून नेहमीच चर्चेत राहणारं जोडपं सॅम हंट आणि त्याची गर्लफ्रेंड हॅन्नाह ली फॉलर यांनी नुकताच साखरपुडा केला आहे. सॅमच्या प्रतिनिधीने पीपुल डॉट कॉम या वेबसाइटला सांगितले की, सॅम आणि हॅन्नाह यांनी साखरपुडा केला आहे. 

मात्र या वृत्ताला अद्यापपर्यंत सॅमकडूनच दुजोरा मिळाल्याने अजूनही संभ्रमावस्था कायम आहे. सॅमच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला ‘ड्रिंकिंग टू मच’ या नावाचे एक गाणे रिलिज केले. ज्यात हॅन्नाह फॉलर ही पुन्हा आयुष्यात आल्याने मी हरकून गेल्याचे म्हटले आहे. 

मात्र यापलीकडे त्यांनी साखरपुडा कुठे केला, या समारंभास कोण कोण उपस्थित होते याविषयीची आणखी माहिती अद्यापही गुलदस्त्यातच आहे. शिवाय हॅन्नाह फॉलर हिच्याकडून या वृत्ताला अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा दुजोरा दिला गेला नसल्याने त्यांनी साखरपुडा केला की नाही याविषयी शंका आहे. 
गेल्या दोन वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करीत होते. बºयाचवेळा त्यांना सार्वजनिक ठिकाणी बघण्यात आल्याने, त्यांच्यातील संबंध कधीच लपून राहिले नव्हते. त्याचबरोबर ते २०१६ मध्येच साखरपुडा किंवा विवाह करतील अशा बातम्या समोर येत होत्या. मात्र नंतरच्या काळात त्यांच्यात बिनसल्याच्या अफवा पसरविल्या गेल्या. 

त्यावेळेस दोघांनीही या अफवांचे खंडन केले होते. आता साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्याने, ते लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Hannaah Faller, Sam Hunt?