Peter Fonda Died: हॉलिवूडच्या या स्टारचं ७९व्या वर्षी झालं निधन, ईजी राइडरमधून मिळाली होती लोकप्रियता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 16:56 IST2019-08-17T16:56:44+5:302019-08-17T16:56:58+5:30
Peter Fonda Death: प्रसिद्ध अभिनेते पीटर फोंडा यांचे निधन झालं आहे.

Peter Fonda Died: हॉलिवूडच्या या स्टारचं ७९व्या वर्षी झालं निधन, ईजी राइडरमधून मिळाली होती लोकप्रियता
'ईजी राइडर', 'घोस्ट राइडर' आणि 'वाइल्ड हॉग्स' यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांचा मन जिंकणारा प्रसिद्ध अभिनेते पीटर फोंडा यांचे निधन झालं आहे. ते ७९ वर्षांचे होते. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार पीटर फोंडा बऱ्याच कालावधीपासून फुफ्फुसाच्या कर्करोगानं ग्रस्त होते. १६ ऑगस्टला त्यांच्या लॉस अँजेलिसमधील राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
पीटर फोंडा यांच्या निधनाबद्दल त्यांची बहिण जैने फोंडा यांनी सांगितलं. पीटर फोंडा यांनी ईजी राइडर चित्रपटाचे लेखन व निर्मिती केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला होता. तसेच या चित्रपटासाठी त्यांना बरेच पुरस्कारही मिळाले आहेत.
पीटर फोंडा यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं तर त्यांचे पहिले लग्न सुसान ब्रुअर यांच्यासोबत झाले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुलं आहेत.
त्यानंतर पीटर फोंडाने पोर्टिया क्रॉकेटसोबत दुसरं लग्न केलं. मात्र हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही आणि अखेर २०११ साली ते विभक्त झाले.
घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी मार्गरेटसोबत लग्न केलं होतं.